August Grah Gochar: ऑगस्टमध्ये राहू-शनी बनवणार धोकादायक योग; `या` राशींनी रहावं सतर्क
August Grah Gochar: ज्योतिष्य शास्त्रानुसार, 24 ऑगस्टला शुक्र कन्या राशीत प्रवेश करणार आहे. या महिन्यात सूर्य आणि शनीचा समसप्तक योग तयार होणार आहे. राहूसोबत सूर्याचा षडाष्टक योग तयार होणार आहे.
August Grah Gochar: ऑगस्ट महिन्यात मंगळ आणि बुधासह अनेक ग्रह त्यांच्या राशी बदलणार आहेत. 5 ऑगस्ट रोजी बुध सिंह राशीत वक्री होणार आहे. याशिवाय 16 ऑगस्ट रोजी सूर्य देखील सिंह राशीत प्रवेश करणार आहे. त्यानंतर 22 ऑगस्टला बुध कर्क राशीत वक्री अवस्थेत प्रवेश करेल. शिवाय 28 ऑगस्ट रोजी बुध ग्रह कर्क राशीत मार्गस्थ होणार आहे
ज्योतिष्य शास्त्रानुसार, 24 ऑगस्टला शुक्र कन्या राशीत प्रवेश करणार आहे. या महिन्यात सूर्य आणि शनीचा समसप्तक योग तयार होणार आहे. राहूसोबत सूर्याचा षडाष्टक योग तयार होणार आहे. ग्रहांच्या अशा स्थितीत मेष राशीसह काही राशीच्या लोकांसाठी ऑगस्ट महिना खूप त्रासदायक असणार आहे. यामध्ये कोणत्या राशींच्या व्यक्तींचा समावेश आहे हे पाहूयात.
मेष रास
मेष राशीच्या लोकांसाठी ऑगस्ट महिना थोडा कठीण जाणार आहे. या महिन्यात कोणतेही जोखमीचे काम करणं टाळावं. याशिवाय तुमच्या आरोग्यावरही या महिन्यात काहीसा परिणाम होणार आहे. तुम्हाला तुमच्या सरकारी कामात काही अडचणी येऊ शकतात. आर्थिक निर्णय घेताना काळजीपूर्वक विचार करण्याचा सल्ला आहे. या काळात तुमचे नुकसान होऊ शकते.
कन्या रास
तुमच्या राशीच्या १२व्या घरात सूर्याचे भ्रमण होणार आहे. अशा परिस्थितीत ऑगस्ट महिन्यात तुमच्या खर्चात लक्षणीय वाढ होणार आहे. तुम्हाला तुमच्या आरोग्यावर खूप पैसा खर्च करावा लागू शकतो. तुम्हाला झोपेशी संबंधित समस्या देखील असू शकतात. या काळात तुम्ही लांबच्या प्रवासाला जाण्याचीही शक्यता आहे. कुटुंबामध्ये कलह होऊ शकतात.
मीन रास
मीन राशीच्या लोकांसाठी ऑगस्ट महिना अनेक समस्या घेऊन येणार आहे. या महिन्यात तुमच्या आर्थिक स्थितीवर मोठा परिणाम होणार आहे. या महिन्यात सूर्य तुमच्या सहाव्या भावात असणार आहे. तुम्हाला कामाच्या ठिकाणी एकामागून एक समस्यांना सामोरे जावे लागेल. तुमचे कोणतेही कोर्ट केस चालू असेल तर त्याचे परिणाम तुमच्यासाठी प्रतिकूल होण्याची शक्यता आहे.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)