Panchak in January 2023: वैदिक ज्योतिषशास्त्रात राज पंचक अत्यंत शुभ मानले जाते. 23 जानेवारीपासून राज पंचक सुरु झाले आहे. ( Raj Panchak ) पाच दिवसात काही काम करणे खूप शुभ आहे. तसे पाहता, धर्म आणि ज्योतिषशास्त्रात पंचक कालावधी शुभ मानला जात नाही आणि या काळात अनेक कामे करु नये असे सांगितले जाते. अग्नी पंचक, चोर पंचक, राज पंचक इत्यादी धार्मिक ग्रंथांमध्ये पंचकांचे पाच प्रकार वर्णन केले आहेत. (Astro News) सोमवारपासून पंचक सुरु होते तेव्हा त्यांना राज पंचक म्हणतात. 2023 सालचे पहिले पंचक  23 जानेवारी 2023 सोमवारपासून सुरु झाले आहे, म्हणजेच राज पंचक. काही कामांसाठी हे पंचक अतिशय शुभ मानले गेले आहेत. (Astro News in Marathi)


 राज पंचक शुभ मानला जातो


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्योतिषशास्त्रानुसार, धनिष्‍ठ नक्षत्राच्या तिसर्‍या चरणातून आणि उत्तराभाद्रपद, पूर्वाभाद्रपद, रेवती आणि शतभिषा नक्षत्र या चारही चरणांमधून चंद्र प्रवास करतो तेव्हा पंचक कालावधी सुरु होतो. तसे पाहता पंचक काळ हा ज्योतिषशास्त्रात अत्यंत अशुभ काळ मानला जातो. पण राज पंचक हा शुभ मानला जातो. सोमवार, 23 जानेवारी रोजी दुपारी 1.52 वाजता सुरु झालेला राजपंचक, शुक्रवार, 27 जानेवारी रोजी संध्याकाळी 6.37 पर्यंत चालेल. 


राज पंचकमध्ये हे कार्य करणे शुभ असते


ज्योतिष शास्त्रानुसार राज पंचकमध्ये धन आणि संपत्तीशी संबंधित काम करणे खूप शुभ मानले जाते. वास्तविक हे काम राज पंचकमध्ये केल्याने यश मिळते. मालमत्तेची खरेदी-विक्री करण्यासोबतच प्रशासकीय आणि राजकीय कामांसाठीही राज पंचक उत्तम आहे. असे केल्याने जीवनात सुख-समृद्धी वाढते. 


पंचकांमध्ये हे काम करु नका 


- पंचकमध्ये घराचे बांधकाम करु नये, म्हणजे घराचे छप्पर घालणे, दरवाजाची चौकट बसवणे अशी कामे करु नयेत. 
- पंचकमध्ये दक्षिण दिशेला प्रवास करु नये. ती यमाची दिशा मानली गेली आहे. पंचकमध्ये दक्षिण दिशेला प्रवास केल्यास अपघात आणि वित्तहानी होण्याची शक्यता आहे. 
- पंचकमध्ये लाकूड, लाकूड साहित्य, इंधन इत्यादी घरी आणू नये. 
- पंचकमध्ये कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास विशेष विधी करुन अंतिम संस्कार करावेत. 


 


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.  ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)