मुंबई : रक्षाबंधन हा सण भाऊ-बहिणीच्या अतूट प्रेमाचं प्रतीक मानलं जातो. राखीचा हा सण श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. त्यानुसार आज रक्षाबंधन सण साजरा होणार आहे. या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी आणि समृद्धीसाठी त्यांच्या मनगटावर राखी बांधतात आणि त्या बदल्यात त्यांच्याकडून त्यांच्या संरक्षणाचं वचन घेतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या दोन आठवड्यांपासून बाजारात राख्यांचा धंदा जोमाने सुरु आहे. सोन्या-चांदीपासून फॅन्सीपर्यंत अनेक राख्या बाजारात पाहायला मिळतात. जर तुम्ही तुमच्या भावासाठी राखी खरेदी करणार असाल तर शास्त्रात सांगितलेल्या काही खास गोष्टी लक्षात घेऊन राखी खरेदी करा.


अशुभ चिन्ह असलेली राखी


फॅन्सी राखीचा ट्रेंड बाजारात जोर धरतोय. पण त्यामध्ये काही अशुभ चिन्हं दडलेली असू शकतात. राखी खरेदी करताना त्यावर कोणत्याही प्रकारचं अशुभ चिन्ह असू नये याकडे लक्ष द्या.


देवी-देवतांची चित्रं असलेली राखी


देवी किंवा देवांची चित्रं असलेल्या राख्या बाजारात पाहायला मिळतात. भावाच्या मनगटावर अशा राख्या कधीही बांधू नयेत हे लक्षात ठेवा. 


तुटलेली राखी 


रक्षाबंधनाला बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी दिसून येते. अशा वेळी अनेकवेळा घाईघाईने लोक तुटलेली विकत घेतात. मात्र भावाच्या मनगटावर तुटलेली राखी कधीही बांधू नये. शास्त्रानुसार तुटलेल्या वस्तूंचा वापर केल्यास अशुभ मानलं जातं.


काळ्या रंगाची राखी 


रक्षाबंधनाला कधीही काळ्या रंगाची राखी खरेदी करू नका. खरं तर काळ्या रंगाला शास्त्रामध्ये नकारात्मकता आणि अशुभतेचं प्रतीक मानलं गेलंय. त्यामुळे या रंगाची राखी खरेदी करणं टाळा.


अशी राखी शुभ


रेशम किंवा सूतीपासून बनवलेली राखी वापरणं शुभ मानलं जातं.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)