Raksha Bandhan 2024 : रक्षाबंधनाला 99% बहिणी भावाला चुकीच्या बोटाने लावतात टिळा; छोट्या आणि मोठ्या भावासाठी कोणतं बोट योग्य?
Raksha Bandhan 2024 : धर्मशास्त्रात टिळा लावण्याचे नियम सांगण्यात आले आहे. रक्षाबंधनाला 99% बहिणी भावाला चुकीच्या बोटाने टिळा लावतात. त्यामुळे लहान आणि मोठ्या भावाला कोणत्या बोटाने टिळ लावावा जाणून घ्या.
Raksha Bandhan 2024 : श्रावण महिना दुसरा सण म्हणजे रक्षाबंधन. भाऊ बहिणीच्या पवित्र नात्याचा सण दरवर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमेला साजरा करण्यात येतो. यंदा श्रावणात तिसऱ्या सोमवारी 19 ऑगस्ट 2024 ला रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यात येणार आहे. यादिवशी बहीण ही भावाचं औक्षण करुन त्याचा मनगटावर राखी बांधते. पण तुम्हाला भावाला टिळा लावण्याची योग्य पद्धत माहितीये का? खरं 99% बहिणी भावाला चुकीच्या बोटाने टिळा लावतात. धर्मशास्त्रात भावाच्या आयुष्यात सकारात्मक परिणाम व्हावा असेल तर बहिणीने कोणत्या बोटाने टिळा करावे हे सांगण्यात आलंय. विशेष म्हणजे लहान भावाला आणि मोठ्या भावाला टिळा करताना वेगवेगळ्या बोटाने टिळा केला जातो. आनंदी वास्तू आणि ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ आनंद पिंपळकर यांनी टिळा लावण्याचा नियमाबद्दल सांगितलंय. (Raksha Bandhan 2024 99 percent Sister apply tilak on Brother Wrong Finger On Raksha Bandhan Tilak Rule Finger)
रक्षाबंधनाला कोणत्या बोटाने टिळा लावावा?
ज्योतिषाच्या मते, भावाच्या कपाळावर टिळा लावताना, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही टिळा लावण्यासाठी कोणते बोट निवडले आहे?. भाऊ मोठा आणि बहीण लहान असल्यास करंगळीवर टिळा लावावा. हे तेच बोट आहे ज्याला अनामिका म्हणून ओळखलं जातं. तर भाऊ लहान आणि बहीण मोठी असेल तर बहिणीने अंगठ्याने टिळा लावून राखी बांधवावी.
हेसुद्धा वाचा - Weekly Horoscope : श्रावणाचा दुसरा आठवडा 12 राशींसाठी कसा असेल? 'या' लोकांवर बरसणार महादेवाची कृपा
उजव्या बोटावर टिळा लावण्याचे फायदे
शास्त्रानुसार रक्षाबंधनाच्या दिवशी जेव्हा एखादी बहीण टिळासाठी योग्य बोटाची निवड करते तेव्हा तिचा भावाच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव पडतो. जेव्हा लहान बहीण आपल्या मोठ्या भावाला करंगळीने टिळा लावते तेव्हा त्याच्या जीवनात सुख-समृद्धी येते.
तर जेव्हा मोठी बहीण तिच्या लहान भावाला अंगठ्याने टिळा लावते तेव्हा त्याच्या जीवनात प्रगती होते. तो प्रत्येक कामात यश मिळवतो आणि निर्भयही होतो.
याशिवाय, हे देखील लक्षात ठेवा की टिळा नेहमी सरळ रेषेत लावावा, वाकड्या पद्धतीने नाही. तसंच कुंकवाचा तिळा लावल्यानंतर तांदूळ लावावे. कारण त्याशिवाय टिळा विधी अपूर्ण मानला जातो.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)