Raksha Bandhan 2024 : दरवर्षी श्रावण पौर्णिमेच्या दिवशी रक्षाबंधनाचा सण मोठ्या थाट्यामाट्यात साजरा करण्यात येतो. हा सण भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक मानला जातो. रक्षाबंधनाच्या दिवशी एक बहीण आपल्या भावाच्या मनगटावर रक्षासूत्र बांधून त्याच्या संरक्षण आणि प्रगतीसाठी प्रार्थना करते. रक्षाबंधनासाठी मार्केट सजली आहे. असंख्य वेगवेगळ्या प्रकारच्या राख्या बाजारात उपलब्ध आहेत. अशात बहिणीनो तुम्ही भावासाठी राखी घेण्यासाठी बाजारात जाणार असाल तर ज्योतिष तज्ज्ञ आनंद पिंपळकर यांनी सांगितल्याप्रमाणे चुकूनही कुठल्याही राख्यांची खरेदी करु नका. अन्यथा त्याचे वाईट परिणाम होतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरवर्षी श्रावण पौर्णिमेच्या दिवशी देशभरात रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो. यंदा 19 ऑगस्टला रक्षाबंधन सण साजरा करण्यात येणार आहे. योगायोगाने यंदा राखी पौर्णिमेला तिसरा श्रावण सोमवार आहे. त्यामुळे या दिवसाचे महत्त्व अधिकच वाढलंय.


ही राखी चुकूनही बांधू नका भावाच्या मनगटावर


ज्योतिषचार्य आनंद पिंपळकर सांगतात की, काळ्या धाग्याची राखी बहिणीने भावाच्या मनगटावर बांधू नका. राखी नेहमी रेशमी धाग्यांनीच असावी. यासोबतच आजकाल अशी फॅशन झाली आहे की राखीवर राधाकृष्ण, शिवलिंग किंवा देवाच्या नावाचा कोणताही शब्द असेल तर अश्या राख्या अजिबात बांधू नका. असे केल्याने भाऊ आणि बहीण दोघांवरही विपरीत परिणाम होतो. प्लास्टिकपासून बनवलेली राखी अजिबात वापरू नये. याचा नकारात्मक परिणाम बहीण भावाच्या आयुष्यावर पडतो. जुनी किंवा तुटलेली राखी अजिबात बांधू नका, कारण तुटलेल्या वस्तू कोणत्याही पूजेत वापरल्या जात नाहीत.


राखी बंधनाचा शुभ मुहूर्त!


प्रत्येक वर्षी रक्षाबंधनाच्या दिवशी भाद्रची सावली राहते आणि भद्रामध्ये शुभ काम करणे अवैध मानली जाते. यंदा रविवार, 18 ऑगस्टला दुपारी 2:21 वाजता भद्रा सुरू होणार असून दुसऱ्या दिवशी 19 ऑगस्टला दुपारी 1:25 वाजता समाप्त होणार आहे. त्यामुळे 19 ऑगस्टला दुपारी 01:25 नंतरच तुम्ही राखी बांधू शकता. 


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)