Raksha Bandhan 2024 : श्रावण महिना म्हणजे सण उत्सव...नागपंचमी आणि त्यानंतर रक्षाबंधनाचा उत्साह...बहीण भावाच्या पवित्र नात्याचा सणावर यंदा भद्रकाळ आणि पंचकची सावली असणार आहे. ज्योतिषशास्त्रात भद्रकाळ आणि पंचक अशुभ काळ मानला जातो. त्यामुळे रक्षाबंधनाला बहीण भावाच्या हातावर रक्षासूत्र म्हणजे राखी बांधू शकेल का? असा प्रश्न बहिणांना पडलाय. (Raksha Bandhan 2024 shadow of bhandra and Panchak on Raksha Bandhan shubh muhurat tie Rakhi )


कधी आहे रक्षाबंधन किंवा राखी पौर्णिमा?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मराठी पंचांगानुसार रक्षाबंधन म्हणजे राखी पौर्णिमा तिथी ही तिसऱ्या श्रावण सोमवारी 19 ऑगस्ट 2024 ला पहाटे 3.04 वाजेपासून रात्री 11.55 वाजेपर्यंत असणार आहे. यादिवशी सर्वार्थ सिद्धी योग, रवियोग आणि शोभन योग असणार आहे. 


राखी पौर्णिमेवर भद्रकाळाची सावली


रक्षाबंधनाची भद्रकाळ हा 19 ऑगस्टला दुपारी 1:30 पर्यंत असणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार भद्रकाळात राखी बांधणे अशुभ मानलं जातं. भाद्र काळात चुकूनही राखी बांधू नये, ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ सांगतात. 


हेसुद्धा वाचा - Nag Panchami 2024: नागपंचमीमधून आपली संस्कृती आपणास काय सांगते? तिथी, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी जाणून घ्या


पंचकाची होणार सुरुवात 


तिसऱ्या श्रावण सोमवारी म्हणजेच राखी पौर्णिमेच्या दिवसापासून 5 दिवस पंचक असणार आहे. हिंदू धर्मात पंचक काळ हा अशुभ मानला जातो. या काळात शुभ कार्य केलं जातं नाही. याशिवाय रक्षाबंधनाच्या दिवशी सायंकाळी 7 वाजल्यापासून पंचक सुरू होत आहे. पण तुम्हाला जाणून आनंद वाटेल की, यंदाचा पंचक हे राजपंचक असल्याने ते शुभ मानले जाते. त्यामुळे रक्षाबंधन सणावर त्याचा परिणाम होणार नाही. 


रक्षाबंधनाला राखी बांधता येणार का?


भद्रकाळ आणि पंचक हे ज्योतिषशास्त्रात अशुभ मानले जातात. पण राखी पौर्णिमेला संपूर्ण दिवस हा अशुभ नाही. तुम्ही आपल्या भावाला राखी बांधून गिफ्ट घेऊ शकता. फक्त शुभ मुहूर्तावर भावाच्या हातावर रक्षासूत्र बांधा. रक्षाबंधनाला राखी बांधण्यासाठी शुभ मुहूर्त दुपारी 1.30 ते रात्री 9.08 पर्यंत असणार आहे. 7 तास 38 मिनिटांच्या या वेळेत राखी बांधणे शुभ मानले जाणार आहे. 


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)