Rakshabandhan Three knots:श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमेला रक्षाबंधन सण साजरा केला जातो. हा सण बहीण भावाचं नातं अधोरेखित करतं. अतूट नातं आणि उत्कट प्रेमाची आठवण करून देणार हा दिवस आहे. या सणाचं औचित्य साधत बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधते. तसेच भावाच्या दीर्घायुष्यासाठी पार्थना करते. पण राखी बांधण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. राखी बांधताना मनगटावर किती गाठ बांधली पाहिजे याचा विचार केला आहे का? काहींना त्याबद्दल माहिती असेल, काहींना नाही. चला तर मग जाणून घेऊयात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राखी  मनगटावर गाठ बांधण्याचे धार्मिक महत्त्व आहे. राखी बांधताना मनगटावर तीन गाठी बांधाव्यात. मनगटावर बांधलेल्या तीन गाठी देवाशी संबंधित आहेत. म्हणजेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश. प्रत्येक गाठ या देवांच्या नावाने समर्पित आहे. त्याचबरोबर तीन गाठी देखील शुभ मानल्या जातात. मनगटावर बांधलेल्या गाठींचा संबंध भाऊ आणि बहिणीच्या नात्याशी देखील असतो. राखीची पहिली गाठ भावाच्या दीर्घायुष्यासाठी, दुसरी गाठ बहिणीच्या दीर्घायुष्यासाठी आणि तिसरी गाठ भाऊ-बहिणीच्या नात्यात गोडवा आणण्यासाठी बांधली जाते.


राखी बांधण्याची शुभ वेळ


श्रावण पौर्णिमा 11 ऑगस्ट रोजी सकाळी 10.38 वाजता सुरू होईल आणि शुक्रवार, 12 ऑगस्ट रोजी सकाळी 07:05 वाजता समाप्त होईल. हिंदू पंचांगानुसार, 11 ऑगस्ट रोजी पूर्ण दिवस असल्यामुळे गुरुवारी, 11 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन सण साजरा केला जाईल. हिंदू पंचांगानुसार, गुरुवारी, 11 ऑगस्टला पौर्णिमा असल्याने, या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधेल. या दिवशी राखी बांधण्यासाठी 12 वाजल्यानंतरची वेळ शुभ मानली आहे. या दिवशी 5:17 ते 6.18 ही वेळ शुभ आहे. 


रक्षाबंधन शुभ योग


अभिजीत मुहूर्त: दुपारी 12:08 ते 12:59 पर्यंत
अमृत ​​काळ: संध्याकाळी 06.55 ते 08.20 पर्यंत
रवि योग: सकाळी 06:07 ते 06:53 पर्यंत


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)