Dhanteras 2023: वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह त्यांच्या ठराविक वेळेनुसार त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी एखाद्या सणाच्या दिवशी अनेक दुर्मिळ संयोग तयार होतात. ज्याचा परिणाम मानवी जीवनावर परिणाम होताना दिसतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यंदाच्या वर्षी 50 वर्षांनंतर धनत्रयोदशीला एक अद्भुत योग तयार होणार आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी यम पंचक शिववास आणि प्रदोष व्रत यांचा योगायोग आहे. हा योग 50 वर्षांनंतर तयार होताना दिसतोय. यामुळे काही राशींवर धनाची देवता कुबेराची विशेष कृपा असणार आहे. जाणून घेऊया यावेळी कोणत्या राशींच्या व्यक्तींना या योगाचा फायदा होणार आहे.


धनु रास (Dhanu Zodiac)


50 वर्षांनंतर तयार होणारा शुभ योग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. यावेळी तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतो. तुम्हाला नशिबाची साथ मिळेल आणि तुमची महत्त्वाची कामे पूर्ण होतील. तुम्हाला जमीन व वाहन इत्यादींचे सुख मिळेल आणि सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन आनंदी राहील आणि सर्व सदस्यांचे सहकार्य मिळेल. तिथे तुमच्या मनोकामना पूर्ण होतील. आतापर्यंत तुमच्या मार्गात जे अडथळे येत होते ते दूर होतील.


मकर रास (Makar Zodiac)


मकर राशीच्या लोकांसाठी एक अद्भुत योग तयार झाल्याने चांगले दिवस सुरू होऊ शकतात. या काळात नवीन लोकांशी तुमचे संबंधही वाढणार आहे. तुम्हाला सन्मान आणि प्रतिष्ठा मिळेल. जर तुम्ही आरोग्याशी संबंधित कोणत्याही समस्येने त्रस्त असाल तर तुम्हाला त्यापासून आराम मिळेल. तुमचं वैवाहिक जीवन आनंदी राहील आणि तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. अचानक तुम्हाला भरपूर पैसे मिळणार आहेत.


मेष रास (Aries Zodiac)


50 वर्षांनंतर तयार होणारा दुर्मिळ योग तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकणार आहे. तुमच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. जुन्या वादांपासून मुक्ती मिळेल. नोकरदार लोकांचा कार्यक्षेत्रात प्रभाव वाढेल आणि सहकारी आणि अधिकारी यांच्याशी संबंध चांगले राहतील. तुम्हाला शेअर बाजार आणि लॉटरीमधून पैसे मिळू शकतात. तुम्हाला जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळतील. नवीन कार्य सुरू करण्यासाठी वेळ अनुकूल आहे.


( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )