Horoscope 5 october : आजच्या दिवशी `या` राशीच्या व्यक्तींनी आरोग्याची काळजी घ्या!
जाणून घ्या तुमचं आजचं राशीभविष्य.
मुंबई : आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल, कुंडलीतील ग्रहांची स्थिती कशी असेल आणि त्याचा तुमच्यावर काय परिणाम होईल याची माहिती घेऊया. जाणून घ्या तुमचं आजचं राशीभविष्य.
मेष
आजच्या दिवशी नोकरीत तुम्हाला नक्कीच यश मिळणार आहे. त्याचप्रमाणे घरात शांतता ठेवा.
वृषभ
आजच्या दिवशी या राशीच्या व्यक्तींनी आरोग्याची काळजी घ्या. संध्याकाळपर्यंत वेळ तुमच्यासाठी अनुकूल आहे.
मिथुन
आज कोणाचाही अपमान करू नका. तुमचे काम मनापासून करा.
कर्क
आजच्या दिवशी घराच्या स्वच्छतेकडे लक्ष द्या. तसंच तुमच्या जवळच्या मित्राला मदत करा.
सिंह
आजच्या दिवशी वडिलांच्या प्रकृतीकडे लक्ष द्या. नोकरीसाठी अर्ज करा.
कन्या
या राशीच्या व्यक्तींनी तुमचं गुपीत कोणाशीही शेअर करू नका. आरोग्याची चिंता मिटणार आहे.
तूळ
आजच्या दिवशी गाडी चालवताना अजिबात घाई करू नका. लवकर घर सोडा.
वृश्चिक
आजचा दिवस तुमच्यासाठी धावपळीने भरलेला असेल. मित्रासोबतच्या छोट्याश्या गोष्टीवरून वाद घालू नका.
धनु
आजच्या दिवशी या राशीच्या व्यक्तींनी कोणत्याही गोष्टींची काळजी करू नका. दुपारनंतर दिवस चांगला जाणार आहे
मकर
आजच्या दिवशी कोणालाही कर्ज देऊ नका. व्यवसायात गुंतवणूक करू नका
कुंभ
आजच्या दिवशी तुमच्या आहाराची काळजी घ्या. कुटुंबात वाद टाळा.
मीन
वडिलांचा अपमान करू नका. नातेवाईकांसोबत सुसंवाद वाढवा. आजच्या दिवशी अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे.