Rashi Parivartan 2022:  हिंदू धर्मानुसार आषाढ महिना धार्मिक सणासुदींचा आहे. या महिन्यात देवशयनी आषाढी एकादशी, गुरुपौर्णिमा हे महत्त्वाचे सण येत आहेत. त्याचबरोबर या महिन्यात ग्रहांचं गोचर देखील होत आहे. ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या संक्रमणाला विशेष महत्त्व आहे. ग्रहांचा गोचर 12 राशींवर परिणाम करत असतो. ग्रहांचा गोचर होत असताना काही राशीत योग तयार होतात. हे योग कधी शुभ, तर कधी अशुभ फळं देतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोणते ग्रह राशी बदल करणार?


  • सूर्य- महिन्याच्या सुरुवातीला सूर्यदेव मिथुन राशीत असणार आहे. 17 जुलैपासून कर्क राशीत प्रवेश करणार आहे.

  • चंद्र- प्रत्येक सव्वा दोन दिवसांनी राशी बदल करणार

  • मंगळ- मेष राशीत असणार आहे.

  • बुध- महिन्याच्या सुरुवातीला वृषभ राशीत, २ जुलैपासून मिथुन राशीत, १६ जुलैपासून कर्क राशीत असणार आहे.

  • गुरू- मीन राशीत असणार असून 29 जुलैपासून वक्री होणार आहे.

  • शुक्र- महिन्याच्या सुरुवातीला वृषभ राशीत असेल आणि 13 जुलैपासून मिथुन राशीत असेल.

  • शनि- महिन्याच्या सुरुवातीला कुंभ राशीत असेल आणि 12 जुलैपासून मकर राशीत वक्री होणार आहे.

  • राहु- मेष राशीत असणार आहे.

  • केतु- तूळ राशीत असणार आहे.


'या' राशींना मिळणार शुभ फळ


मिथुन: नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना या महिन्यात चांगली बातमी मिळेल. व्यवसायात नवीन करार निश्चित होतील आणि व्यवसायाचा विस्तार होईल. नोकरी करणाऱ्या लोकांना बढती आणि मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. पुढील महिना गुंतवणुकीसाठी योग्य आहे. कुठूनतरी अचानक पैसे मिळण्याची शक्यता आहे.


सिंह: परदेशात नोकरी मिळवण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. अनेक रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि काही नवीन जबाबदारी मिळू शकते. तुम्हाला नवीन नोकरीच्या ऑफर मिळू शकतात. तुम्हाला व्यवसायातही यश मिळेल.


मेष : या राशीच्या लोकांसाठी जुलै महिन्यात सावध राहण्याची आवश्यकता आहे. या महिन्यात तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. कुटुंबाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तसेच रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. या अडचणीच्या काळात संयम गमावू नका.


धनु : जुलैमध्ये धनु राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळेल. धन देव कुबेराची  तुमच्यावर कृपा असेल. तुमच्या उत्पन्नाचे स्रोत वाढतील आणि तुम्हाला अनेक मार्गांनी पैसे मिळतील.  गुंतवणुकीसाठी हा काळ उत्तम राहील. कोर्टाशी संबंधित प्रकरणे मिटतील आणि नवीन मालमत्ता खरेदी करण्याचा योग आहे.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE24TAAS याची पुष्टी करत नाही.)