मुंबई : ग्रहण या विषयाबद्दल भारतात अनेक समजूती प्रचलित आहे. त्यातील एक समजूत म्हणजे ग्रहणानंतर अंघोळ करणे का गरजेचे आहे. त्याचबरोबर ग्रहण काळात अन्न शिजवू नये. शिजवलेल्या अन्नावर तुळसीपत्र ठेवावे. याला श्रद्धा-अंधश्रद्धेचे नाव दिले तरी यामागे काही स्वास्थ्याच्या सुरक्षिततेचा उद्देश आहे. चला जाणून घेऊया...


अन्न-पाण्यावर तुळशीपत्र ठेवावे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुळशीपत्र हे पवित्र मानले जाते. ते अन्नावर, पाण्यात घातले जाते. बायोनेनोसाईन्स २०१५ च्या आर्टिकलनुसार, तुळशीत जंतूनाशक गुणधर्म असतात. त्यामुळे अन्न आणि पाणी शुद्ध राहण्यास मदत होते. ग्रहणादरम्यान जीवजंतू, किडाणू वाढीस लागतात. म्हणून त्याकाळात अन्न, पाणी प्रदूषित होऊ नये म्हणून त्यावर तुळशीपत्र ठेवले जाते.


ग्रहणादरम्यान शिजवलेले अन्न खाऊ नये


या धारणेमागे वैज्ञानिक कारण आहे. ग्रहणादरम्यान जीवाणूनाशक युव्ही रेडिएशन्स उपलब्ध नसतात. जे अन्नाचे जीवाणूंपासून संरक्षण करतात. त्यामुळे ग्रहण काळात अन्न खराब होण्याची शक्यता अधिक असते. म्हणून ग्रहणादरम्यान शिजवलेले अन्न खाऊ नये, असे म्हटले जाते.


ग्रहणानंतर अंघोळ करावी


ग्रहणापूर्वी आणि ग्रहणानंतर राहुचा प्रभाव असतो आणि अंघोळीनंतरच तो जातो, अशी समजूत आहे. या विचारामागे विज्ञान आहे. सूर्याच्या कमी प्रकाशामुळे जीवाणू, कीटाणू अधिक प्रमाणात वाढू लागतात. त्यामुळे इंफेक्शनची संभावना अधिक वाढते. आजारी पडण्याचे प्रमाण वाढते. म्हणू स्वास्थ्याचा विचार करून ही परंपरा सुरू केली असावी.


संदर्भ-


Raj, D. S., Sushmetha, A. M., Jayashree, S., Seshadri, S., Balasubramani, S., Pemaiah, B., & Parthasarathy, M. (2015). Hierarchical Nanofeatures Promote Microbial Adhesion in Tropical Grasses: Nanotechnology Behind Traditional Disinfection. BioNanoScience, 5(2), 75-83.


Kumar, S. S., & Rengaiyan, R. (2014). Vedic mythology of solar eclipse and its scientific validation. Indian Journal of Traditional Knowledge, 13(4), 716-724.