Guru Uday 2024: ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह विशिष्ट अंतराने त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. ग्रह गोचर प्रमाणे अस्त आणि उदय देखील होतात. ग्रहांच्या या स्थिती बदलाचा प्रत्येक राशींच्या व्यक्तींवर परिणाम होताना दिसतो. यावेळी मान-प्रतिष्ठेचा कारक असलेला बृहस्पति जूनच्या सुरुवातीला वृषभ राशीत उदय होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्योतिष्य शास्त्रानुसार, गुरु ग्रहाच्या उदयाचा परिणाम सर्व राशीच्या लोकांवर होणार आहे. मात्र यावेळी अशा 3 राशी आहेत ज्यांच्या संपत्तीमध्ये या काळात प्रचंड वाढ होऊ शकणार आहे. जाणून घेऊया गुरु ग्रहाच्या उदयामुळे कोणत्या राशींच्या व्यक्तींना अधिक सकारात्मक परिणाम मिळणार आहे. 


वृश्चिक रास (Scorpio Zodiac)


गुरूचे उदय तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. या काळात विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन आनंदी राहणार आहे. शिक्षणाच्या दृष्टीने हा काळ खूप चांगला आहे. तुम्हाला भागीदारीच्या कामात फायदा होईल. या कालावधीत केलेली गुंतवणूक तुम्हाला दुप्पट नफा देणार आहे. उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्यांसाठीही काळ चांगला राहील. तुमच्या  मनोकामना पूर्ण होतील. जे अविवाहित आहेत त्यांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. 


कन्या रास (Kanya Zodiac)


गुरूचे उदय तुमच्यासाठी शुभ ठरू शकणार आहे. गुरू ग्रह तुमच्या राशीतून भाग्यस्थानात जाणार आहे. नशीब तुम्हाला साथ देणार आहे. वडिलांकडूनही तुम्हाला आर्थिक लाभ मिळण्याची अपेक्षा आहे. तुम्हाला अनेक आश्चर्यकारक संधी देखील मिळतील. तुमची प्रलंबित कामे पूर्ण होतील. ज्या विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घ्यायचे आहे त्यांची इच्छा पूर्ण होऊ शकते. व्यापारी वर्ग आपला व्यवसाय वाढवू शकतो. 


मकर रास (Makar Zodiac)


मकर राशीच्या लोकांसाठी गुरूचा उदय लाभदायक ठरू शकतो. या काळात तुम्हाला तुमच्या मुलाशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. या काळात विद्यार्थ्यांना पूर्वीपेक्षा चांगले निकाल मिळणार आहेत. शेअर मार्केटमध्येही नफा होऊ शकतो. नोकरदार लोकांना प्रमोशन मिळू शकते. परदेशात जाण्यास इच्छुक आहेत त्यांना परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक लाभ मिळतील. 


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)