Valentine Day : लाल गुलाबाचा हा उपाय दूर करेल प्रेमविवाहातील अडथळा, धनलाभसाठी करा हे उपाय
Rose Day : आजपासून Valentine Week सुरुवात झाली आहे. या उत्सावातील पहिला दिवस म्हणजे Rose Day...जर तुम्हाला घरात सुख-समृद्धी हवी असेल तर तुम्ही गुलाबाच्या फुलाचे काही निश्चित उपाय करून पाहू शकता.
Rose Flower Remedies In marathi : आज मंगळवार आणि आजपासून Valentine Week ला सुरुवात झाली आहे. प्रेमाच्या उत्सवात गुलाबाच्या फुलाला विशेष महत्त्वं आहे. या वीकचा पहिलाच दिवस Rose Day...आज आपल्या प्रिय व्यक्तीला गुलाबाचे फुलं दिलं जातं. तुम्हाला हे माहिती आहेतच की प्रेमाचं हे प्रतिक गुलाब अनेक देवतांना अर्पण (Rose Remedies Vastu Tips ) केलं जातं. ज्योतिषशास्त्रात (Jyotish Shastra) या एका गुलाबाने तुमचं आयुष्य बदलू शकतं. लाल गुलाबाचा उपाय (rose totke) प्रेमविवाहातील (love marriage) अडथळापासून धनलाभसाठी (money rose upay) करु शकता. मग चला जाणून घेऊयात कुठल्या समस्येसाठी कुठला उपाय करता येईल ते...
'हे' उपाय करा, आयुष्य बदला
1. शास्त्रानुसार मंगळवारी हनुमानजींना 11 गुलाब अर्पण केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. प्रेमविवाहात अडथळा निर्माण होतं असेल तर मंगळवारी एका कागदावर आपल्या जोडीदाराचं नाव लिहून हनुमानजीची प्रार्थना करा आणि नंतर गुलाब अर्पण करा, कागद आपल्याजवळ ठेवा.
2. याशिवाय सोमवारी किंवा प्रदोष व्रताच्या दिवशी भगवान शंकराला लाल गुलाबाचा अत्तर अर्पण करा. या उपायाने वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतील. पितृदोष असल्यानेही वैवाहिक जीवनात बाधा येतं असं तर अशा परिस्थितीत ज्येष्ठांचा, महिलांचा कधीही अपमान करू नका.
3. इच्छित व्यक्तीशी लग्न करण्यासाठी शास्त्रानुसार गुलाबाच्या फुलात कापूर टाकून संध्याकाळी जाळावे आणि देवी दुर्गाला प्रार्थना करा. हा उपाय आठवडाभर रोज करा. असं मानलं जातं की हा उपाय केल्यास लवकरच एक योग्य जीवनसाथी मिळेल.
4. घरामध्ये रोज एका काचेच्या भांड्यात ताज्या आणि सुवासिक गुलाबाच्या पाकळ्या घाला. यामुळे पती-पत्नीच्या नात्यात गोडवा राहतो.
5. जे लोक अविवाहित आहेत आणि लव्ह पार्टनर शोधत आहेत त्यांनी शिवलिंगावर गुलाबाचे फूल अर्पण करावे आणि ते नेहमी आपल्याजवळ ठेवावे. या उपायांमुळे खरं प्रेम लवकर मिळण्याची शक्यता वाढते.
6. लव्ह लाईफमध्ये तणाव असेल तर लाल कपड्यात लाल चंदन, लाल गुलाब आणि रोळी बांधून घरातील मंदिरात ठेवा. आता त्यातील लाल गुलाब तुमच्या जोडीदाराला द्या आणि वाद मिटवा. शास्त्रात असं म्हणतात की यामुळे नात्यातील खट्टूपणा संपतो.
7. जर तुमची आर्थिक स्थिती कमकुवत असेल तर कोणत्याही शुक्रवारी संध्याकाळी गुलाबाच्या फुलात कापूरचा तुकडा जाळून टाका आणि कापूर जाळल्यानंतर ते फूल देवी लक्ष्मीला अर्पण करा. असं केल्याने धनाची प्राप्ती होईल आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहील.
8. तुमची तिजोरी नेहमी धन-धान्याने भरलेली असावी असं वाटत असेल तर मंगळवारी लाल चंदन, लाल गुलाब आणि रोळी घेऊन या सर्व वस्तू लाल कपड्यात बांधून ठेवा. हनुमानजींच्या समोर मंदिरात किंवा घरातील हनुमानजींच्या मूर्तीसमोर 1 आठवडा ठेवा आणि 1 आठवड्यानंतर ही पोटली आपल्या घराच्या किंवा दुकानाच्या तिजोरीत ठेवा. असं केल्याने तुम्हाला पैसे मिळतील आणि तिजोरी नेहमी पैशांनी भरलेली राहील.
9. जर तुमच्यावर मोठं कर्ज असेल आणि तुम्हाला त्यातून सुटका हवी असेल तर 5 लाल गुलाबाच्या पाकळ्या घ्या आणि नंतर चार गुलाब एका पांढऱ्या कापडाच्या चार कोपऱ्यात बांधा. यानंतर या कापडाच्या मध्यभागी पाचवे फूल बांधावे. त्याचा एक बंडल बनवा आणि वाहत्या नदीत वाहू द्या. गुलाबाची ही युक्ती केल्याने कर्जातून मुक्ती होईल आणि तुमच्या घरात सुख-समृद्धीही नांदेल.
10. सुपारीच्या पानात सात गुलाबाच्या पाकळ्या ठेवाव्यात आणि दुर्गादेवीला अर्पण कराव्यात. या उपायाने तुम्ही कुंडलीतील अनेक दोष दूर करू शकता.
11. कुंडलीतील मंगल दोष दूर करण्यासाठी मंगळवारी शिवलिंगावर 11 गुलाब अर्पण करा. या उपायाने तुम्हाला भगवान शिवाची कृपा देखील प्राप्त होईल.
12. जर तुमच्या मनात एखादी मोठी इच्छा असेल जी तुम्हाला पूर्ण करायची असेल तर मंगळवारी हनुमानजींना 11 ताजे गुलाबाची फुले अर्पण करा. हा उपाय सलग 11 मंगळवार केल्यास तुमची सर्वात मोठी इच्छा पूर्ण होईल.
13. घरातील पैशाची तंगी दूर करण्यासाठी दर शुक्रवारी देवी लक्ष्मी आणि गणपतीला 11 गुलाब अर्पण करा, तसंच देवी मंत्राचा जप करा. यामुळे आयुष्यात येणारी पैशाची चणचण दूर होईल.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)