Ruchak Yog In Kundli: वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक महिन्यात अनेक ग्रह गोचर करणार आहे. यावेळी दिवाळीनंतर अनेक ग्रहांचे गोचर होऊन शुभ-अशुभ योग निर्माण होणार आहेत. ज्यामध्ये ग्रहांचा सेनापती मंगळाचाही समावेश आहे. मंगळाच्या गोचरमुळे एक खास योग तयार होणार असून याचा अनेक राशींना फायदा होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

16 नोव्हेंबरला मंगळ वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे एक रूचक राजयोग निर्माण होणार आहे. ज्योतिषशास्त्रात हा राजयोग अत्यंत शुभ मानला जातो. त्यामुळे या राजयोगाच्या निर्मितीमुळे काही राशींना अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. जाणून घेऊया रूचक योगाच्या निर्मितीमुळे कोणत्या राशींच्या व्यक्तींना फायदा होणार आहे. 


तूळ रास (Tula Zodiac)


रूचक महापुरुष राजयोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. कारण मंगळ तुमच्या राशीतून धन गृहात जाणार आहे. त्यामुळे यावेळी तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित पैसे मिळतील. तुम्हाला आर्थिक बाबतीत फायदा होईल. तुमच्या व्यक्तिमत्त्वात सुधारणा दिसून येणार आहे. या काळात तुमच्या वैवाहिक जीवन आनंदी राहणार आहे. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडूनही सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवनात सुख-समृद्धी येण्याची शुभ शक्यता आहे.


मकर रास (Makar Zodiac)


रूचक महापुरुष राजयोग मकर राशीच्या लोकांसाठी अनुकूल सिद्ध होऊ शकतो. मंगळ तुमच्या संक्रमण कुंडलीतील उत्पन्नाच्या घरात जाणार आहे. त्यामुळे यावेळी तुमचे उत्पन्न वाढेल. तुम्हाला जुन्या गुंतवणुकीतून फायदा होताना दिसत आहे. तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये काही सुवर्ण संधी मिळू शकतात. एखाद्याला दिलेले कर्ज परत मिळवू शकता. बिझनेसमध्ये नवीन संधी मिळतील आणि पैशाशी संबंधित बाबींमध्ये विशेष फायदा होणार आहे.


सिंह रास (Leo Zodiac)


रूचक महापुरुष राजयोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. यावेळी तुम्ही वाहन आणि मालमत्ता खरेदी करण्याचा निर्णय घेऊ शकता. तुम्हाला करिअर आणि व्यवसायात काही उत्कृष्ट ऑफर मिळू शकतात. यावेळी नशीब तुम्हाला साथ देईल. प्रवास तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतो.  तुम्हाला कधीही संपत्तीची कमतरता भासणार नाही. स्थावर मालमत्तेशी संबंधित व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ उत्कृष्ट सिद्ध होणार आहे.


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)