Sankashti Chaturthi 2024 Shubh Yoga : पौष महिन्याच्या कृष्ण पक्षातील संकष्टी चतुर्थी ही अतिशय खास आहे. या दिवसाला सकट चौथ असंही म्हटलं जातं. या दिवशी गणरायाला सर्व संकटांपासून मुक्ती मिळवण्यासाठी उपासना केली जाते. यादिवशी तब्बल 100 वर्षांनी अद्भूत योग असणार आहे. या दिवशी शोभन योगसोबत धनु राशीत सूर्य, शुक्र आणि बुध असल्यामुळे त्रिग्रही योग तयार होत आहे. यामुळे काही राशींना या आश्चर्यकारक संयोगाचा जबरदस्त फायदा होणार आहे. आर्थिक फायद्यासह करिअर आणि वैवाहिक जीवनात आनंद देणार आहे. बाप्पा काही राशींना खास महाप्रसाद देणार आहे. (Sakat Chauth 2 amazing yogas on Sankashti Chaturthi after 100 years These zodiac sign will get financial gain)


कधी आहे संकष्टी चतुर्थी?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हिंदू पंचांगानुसार संकष्टी चतुर्थी तिथी ही 29 जानेवारी 2024 ला सकाळी 6.10 पासून 30 जानेवारीला सकाळी 8.54 वाजेपर्यंत असणार आहे. 


'या' राशींवर गणरायाला असणार प्रसन्न!


तूळ रास (Libra Zodiac)  


या राशीच्या जीवनात सुख-समृद्धी नांदणार आहे. श्रीगणेशाच्या कृपेने सर्व कामं यशस्वी होणार आहेत. दीर्घकाळ चाललेल्या समस्या या योगामुळे दूर होणार आहे. व्यवसायात प्रगतीच्या संधी मिळणार आहे. आर्थिक लाभाचे नवीन स्रोत निर्माण होणार आहेत. 


वृश्चिक रास (Scorpio Zodiac)  


या राशीच्या लोकांना संकष्टी चतुर्थी लाभदायक ठरणार आहे. कामाच्या ठिकाणी चांगली बातमी मिळणार आहे. जमीन किंवा वाहन खरेदीचे योग निर्माण झाले आहेत. तुम्हाला मागील गुंतवणुकीतून चांगला परतावा लाभणार आहे. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळणार आहे. आर्थिक स्थिती सुधारणार आहे. 


कुंभ रास (Aquarius Zodiac) 


संकष्टी चतुर्थी तुमच्यासाठी लकी असणार आहे. पैशाची आवक होण्याचे नवीन मार्ग मोकळे होणार आहेत. सामाजिक प्रतिष्ठा आणि मान वाढणार आहे. उत्पन्नात वाढ होण्याची दाट शक्यता आहे. घरामध्ये शुभ कार्ये ठरणार आहे. सुख-सुविधांनी युक्त जीवन जगणार आहात. 


मीन रास (Pisces Zodiac) 


या राशीच्या लोकांना संकष्टी चतुर्थी फायदेशीर ठरणार आहे. अडकलेले पैसे परत मिळणार असून संपत्तीत वाढ होणार आहे. व्यवसायात प्रगतीच्या संधी मिळणार आहे. तब्येत सुधारणा होणार आहे. वैवाहिक जीवनात आनंदाचे वातावरण असणार आहे. 


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)