Sankashti Chaturthi 2022: कलाधिपती आणि ईष्ठ देवता म्हणून गणल्या जाणाऱ्या गणपती गजाननाची पूजा करत बाप्पासाठी खास नैवेद्याचा बेत आखला जातो तो म्हणजे संकष्टी चतुर्थीला (Sankashti Chaturthi 2022). (Ganpati) गणपतीला समर्पित असणारा हा उपवास महिला, आपल्या लेकरांच्या सुखासाठी करतात असं म्हटलं जातं. या महिन्यातील संकष्टी 11 डिसेंबर 2022 म्हणजेच रविवारच्या दिवशी आली आहे. त्यामुळं या वेळची रविवारची सुट्टी अनेकांच्याच घरी गोडाधोडाचा बेत असेल. 


संकटं दूर होणार, कशी ते पाहा 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हिंदू धर्मात (Hindu Religion) संकष्टी चतुर्थीला फार महत्त्वं आहे. असं म्हणतात जो कोणी हा उपवास ठेवतो त्याच्या सर्व अडचणी दूर होतात आणि गजाननाची कृपा त्या व्यक्तीवर असते. त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात, कारण गणपती बुद्धी, समृद्धी आणि सौभाग्याची देवता आहे. 


संकष्टीचा मुहूर्त 


यावेळची संकष्टी सायंकाळी 4 वाजून 14 मिनिटांनी सुरु होऊन दुसऱ्या दिवशी 12 डिसेंबरला सायंकाळी 6 वाजून 48 मिनिटांनी समाप्त होणार आहे. या संकष्टीला 11 तारखेला, म्हणजे रविवारी रात्रौ 8 वाजून 40 मिनिटांनी चंद्रोदय होणार असून, तेव्हाच चंद्राला अर्घ्य दिल्यानंतर उपवास पूर्ण होणार आहे. 


संकष्ट चतुर्थीच्या उपवासाचे सकारात्मक परिणाम 


- असं म्हणतात की संकष्टीच्या दिवशी स्वत:च्या हातांनी गणपतीला लाल रंगाचं फुल अर्पण करा. असं करताना गणरायाचं नामस्मरण सुरु ठेवा. या उपायामुळं घरात सुखशांती नांदेल. 


हेसुद्धा वाचा : Astro tips: तुळशीची माळ जपताना घ्या 'ही' काळजी, धनलाभासह होतील अनेक फायदे


 


- घरात अष्टमुखी रुद्राक्ष असल्यास त्याची यशासांग पूजा मांडा आणि गळ्यात रुद्राक्षांची माळ धारण करा. असं केल्यास नोकरी, करिअरमध्ये यश प्राप्त होतं. 


- संकष्टीच्या दिवशी गणपतीला चंदनाचा टिळा लावा. सोबतच नामस्मरण सुरु ठेवा. वर्कतुण्ड महाकाय.... हा श्लोक अखंड बोलत राहा आणि पूजा करा. असं केल्यास व्यक्तीच्या मनीच्या सर्व इच्छा पूर्ण होतात.