Sankashti Chaturthi 2024 :हिंदू पंचांगानुसार प्रत्येक महिन्याच्या कृष्प पक्षाच्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थीचा उपवास केला जातो. शुभ कार्याची सुरुवात ही विघ्नहर्त्याचा आराधनेने केली जाते. असं म्हणतात की, संकष्टी चतुर्थीचा उपवास केल्यास आपले सर्व कामं पूर्ण होतात आणि तुम्हाला यश प्राप्त होते. मार्च महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थीला भालचंद्र संकष्टी असं म्हटलं जातं. मार्च महिन्यातील संकष्टी चतुर्थी तिथी ही 28 मार्चला असणार आहे. (sankashti chaturthi 2024 date Why is Chandradarshan so important See myths and popular stories chandrodaya timing)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंचांगानुसार 28 मार्चला संध्याकाळी 6:56 वाजेपासून 29 मार्चला रात्री 8:20 वाजेपर्यंत असणार आहे. उदय तिथीनुसार संकष्टीचं व्रत 28 मार्चला करायचं आहे. तर पूजेसाठी शुभ मुहूर्त सकाळी 10:54 ते दुपारी 12:26 पर्यंत असार आहे. त्यानंतर संध्याकाळी 5.04 ते 6.37 पर्यंत असणार आहे. 28 मार्चला चंद्रोदयाची वेळ रात्री  9:28 असणार आहे. संकष्टीचं व्रत हे चंद्रदर्शनानंतर सोडलं जातं. जर तुम्ही चंद्रदर्शन न करता उपवास सोडल्यास तुम्हाला व्रताच फळ मिळत नाही. संकष्टी चतुर्थीला चंद्राला एवढं महत्त्व का? तुम्हाला माहिती आहे का?


गणपती आणि चंद्राची कथा


पौराणिक कथेनुसार चंद्राला गणेशाचे स्वरुप नीट कळलं नव्हतं. त्यामुळे चंद्राने गणरायाची थट्टा करायला सुरुवात केली. गणरायाला चंद्राच्या थट्टेने राग आला आणि त्यांनी चंद्राला शाप दिला. यानंतर तुझं तोंड कोणी पाहणार नाही. गणरायाने हा शाप यासाठी दिला की, कोणीही कोणाच्या व्यंगावरुन त्याची थट्टा करुन नये, त्यावर हसू नये की त्याला कमी लेखू नये. चंद्राला आपली चुक उमगली. त्याने गणरायची क्षमा मागितली. विघ्नहर्त्याने चंद्राला माफ केलं आणि उ:शाप दिला की, गणेश चतुर्थीला तुझं कोणी दर्शन घेणार नाही. पण संकष्टी चतुर्थीला तुझ्या दर्शनाशिवाय भक्त उपवास सोडणार नाही. गणेशाच्या या शब्दाचे भक्त आजही पालन करतात. संकष्टी चतुर्थीला चंद्रदर्शन घेऊन अन्न ग्रहण म्हणजे उपवास सोडतात. 


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)