Sankashti Chaturthi Vrat 2022: हिंदू पंचागानुसार प्रत्येक महिन्यात दोन चतुर्थी तिथी असतात. कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी आणि शुक्ल पक्षातील चतुर्थीला विनायक चतुर्थी म्हणतात. या महिन्यातील संकष्टी चतुर्थी आज  उपवास 12 नोव्हेंबरला (November) केला जाणार. चतुर्थी तिथी ही गणेशाला समर्पित मानली जाते. या दिवशी भक्ती भावाने श्री गणेशाची पूजा (ganesh pooja) केल्यास सर्व संकटं दूर होतात असे मानले जाते. आज संकष्टी चतुर्थीची शुभ मुहूर्त आणि पूजेची पद्धत जाणून घेऊया.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या दिवशी भगवान गणेशाची (Ganpati) पूजा केली जाते. श्रीगणेश हा भक्तांसाठी संकटमोचन मानला जातो. असे म्हणतात की, श्रीगणेशाची आराधना केल्याने भक्तांचे सर्व संकट दूर होतात. या दिवशी गणपतीची आराधना केल्याने आणि उपवास केल्याने ज्ञान आणि ऐश्वर्य प्राप्त होते, असे मानले जाते.


संकष्टी चतुर्थी शुभ मुहूर्त 2022


11 नोव्हेंबर 2022 रोजी रात्री 08.17 वाजता तुर्थी तिथी सुरू होईल.


ही तारीख 12 नोव्हेंबर 2022 रोजी रात्री 10.25 वाजता संपेल.


या दिवशी चंद्रोदयाची वेळ रात्री 8:21


चंद्रोदयाचे महत्त्व


संकष्टी चतुर्थीच्या ( Sankashti Chaturthi )  दिवशी गणेशाची पूजा केली जाते. तसेच गणपती बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी मनोभावे उपवास देखील करतात. दिवसभर उपवास केल्यानंतर रात्री उपवास सोडला जातो. मात्र उपवास सोडण्यापूर्वी रात्री चंद्राला अर्घ्य दिल्यावरच व्रत मोडते. यावेळी गणाधीश संकष्टी चतुर्थीच्या दिवशी रात्री 8.21 वाजता चंद्र उगवेल.


वाचा : पंचांगानुसार जाणून घ्या आजचे सर्व शुभ- अशुभ मुहूर्त 


संकष्टी म्हणजे काय?


संकटांचं हरण करणारी चतुर्थी असा संकष्टी चतुर्थीचा अर्थ होतो. संस्कृत भाषेत संकष्टी या शब्दाचा अर्ध, कठीण काळापासून मुक्ती मिळणे असा होतो. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या संकटातून मुक्ती मिळवण्यासाठी या दिवशी विधीवत श्री गणेशाची पूजा केली जाते आणि दिवसभर व्रत पाळले जाते. संकष्टी चतुर्थीला लोक सुर्योदयापासून ते चंद्रोदय होईपर्यंत उपवास करतात.


संकष्टी चतुर्थीची पूजा पद्धत


जर तुम्ही संकष्टी चतुर्थीच्या  ( Sankashti Chaturthi )  दिवशी उपवास करत असाल तर सकाळी लवकर उठून स्नान करून पूजास्थान स्वच्छ करून गंगाजल शिंपडावे. यानंतर श्री गणेशाल वस्त्र अर्पण करा आणि देवघरात दिवा लावा. श्री गणेशाला तिलक लावून फुले अर्पण करा. यानंतर गणपतीला 21 दुर्वा आणि साजूक तूपातील लाडू किंवा मोदक अर्पण करा. पूजा संपल्यानंतर श्री गणेशाची आरती करा. आरतीनंतर पूजेत काही चूक झाली असेल तर श्री गणेशाची क्षमा मागावी आणि व्रताचा संकल्प घ्यावा. उपवासाची कथा वाचायला विसरू नका.


 


 


 


Disclaimer: ही स्टोरी सामान्य गृहीतकांवर आधारित आहे. Zee 24 Taas त्याची पुष्टी करत नाही.