Kendra Trikon Rajyog : वैदिक ज्योतिषशास्त्रात शनिदेवाला विशेष महत्त्व आहे. त्यानुसार शनि ग्रह जेव्हा जेव्हा आपली स्थिती बदलतो जाचकाला भीती वाटते. शनीदेव कर्मदाता असल्याने तो आपल्याला कर्माचं फळं देतो. सध्या शनी मूळ त्रिकोणी कुंभ राशीत विराजमान आहे. त्यामुळे केंद्र त्रिकोण राजयोग निर्माण झाला आहे. हा राजयोग तीन राशींसाठी भाग्यशाली ठरणार आहे. (saturn in aqueous kendra trikon rajyoga in kumbh or Aquarius these zodiac sign will get benefit Shani Gochar) शनिदेव हा वाईट कर्म करणाऱ्याला शिक्षा देतो आणि चांगले कर्म करणाऱ्या जाचकाला चांगले दिवस दाखवतो. 


वृषभ (Taurus) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार कुंभ राशीत शनिदेवाच्या स्थितीमुळे केंद्र त्रिकोण राजयोग जुळून आला आहे. असा या अत्यंत शुभ राजयोगामुळे वृषभ राशीचे चांगले दिवस येणार आहेत.  कार्यक्षेत्रात केलेल्या मेहनतीचं फळं त्यांना मिळणार आहे. त्याची बढती होण्याची चिन्ह आहेत. कुटुंबातील समस्या दूर होणार आहेत. बेरोजगारांना नोकरीची उत्तम संधी मिळणार आहे. आर्थिक स्थिती चांगली होणार आहे. 


हेसुद्धा वाचा - Shani Vakri 2023 : शनीची वक्री दृष्टी 'या' लोकांचा करेल नाश! आजपासून करा हे काम



सिंह (Leo)


सिंह राशीच्या लोकांना केंद्र त्रिकोण राजयोगाचा अतिशय लाभ होणार आहे. या लोकांना कुटुंबाची आणि जोडीदाराची पूर्ण साथ मिळणार आहे. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमचं कौतुक होणार आहे. तुमचा मान सन्मान वाढणार आहे. पाटर्नशीपमध्ये व्यवसाय करणाऱ्या लोकांना या राजयोगाचा फायदा होणार आहे. न्यायालयीन प्रकरणे मार्गी लागणार आहेत. 


कुंभ (Aquarius) 


शनिदेव हा स्वगृही म्हणजे कुंभ राशीतच विराजमान आहे. त्यामुळे कुंभ राशीतच केंद्र त्रिकोण राजयोग तयार झाला आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना याचा सर्वाधिक लाभ होणार आहे. त्यांचा आत्मविश्वास वाढणार असून बौद्धिक क्षमताचे विकासाच्या जोरावर ते जग जिंकणार आहेत. वैवाहिक जीवनातील संकट हळूहळू दूर होणार आहे. तुमच्या स्वभावाने तुम्ही आजूबाजूच्या लोकांची मनं जिंकून घेणार आहात. 
 


हेसुद्धा वाचा - Chandra Gochar 2023 : 7 ऑगस्टला त्रिग्रही योग, गजकेसरी योग आणि चांडाळ योग! 'या' राशींचं चमकणार नशिब


 


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)