Shani Vakri 2023 : शनीची वक्री दृष्टी 'या' लोकांचा करेल नाश! आजपासून करा हे काम

Shani Vakri Bad Effect : ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्याही ग्रहाच्या उलट हालचालीला प्रतिगामी अवस्था म्हणतात. कृपया सांगा की यावेळी शनि कुंभ राशीत प्रतिगामी आहे. ज्योतिषशास्त्रात शनीची वक्र दृष्टी अशुभ मानली जाते. जाणून घ्या या काळात कोणत्या राशीच्या लोकांनी काळजी घ्यावी.

नेहा चौधरी | Updated: Aug 5, 2023, 05:45 AM IST
Shani Vakri 2023 : शनीची वक्री दृष्टी 'या' लोकांचा करेल नाश! आजपासून करा हे काम title=
Shani Vakri 2023 these zodiac sign people Bad Effect shani upay astro tips

Shani Vakri Effect Upay : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह आपल्या ठराविक वेळेनंतर आपलं स्थान बदलतो. प्रत्येक ग्रहाचा परिणाम हा वेगवेगळा असतो.  9 ग्रहांपैकी जाचकाला शनिदेवाची भीती वाटते. कारण शनीदेवाची वक्रदृष्टी ही जाचकाला महासंकटात टाकते. शनी अति संथ गतीने आपलं घर बदलतो. यावर्षी शनी स्वगृही कुंभ राशीत प्रवेश केला आहे. त्यानंतर 17 जूनला तो कुंभमध्ये प्रतिगामी झाला आहे. अशा स्थितीत शनीची वक्री दृष्टी सर्व राशींवर परिणाम करणार आहे, असं ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ सांगतात. ज्योतिषशास्त्रात शनीची वक्र बाजू ही अतिशय अशुभ मानली जाते. अशा परिस्थितीत हा काळ काही राशींसाठी खूप धोकादायक असून 4 नोव्हेंबरपर्यंत या राशीच्या लोकांनी विशेष काळजी घ्यायला हवी असं सांगण्यात आलं आहे.  (Shani Vakri 2023 these zodiac sign people Bad Effect shani upay astro tips)

'या' राशीच्या लोकांनी राहवं सतर्क 

ज्योतिषशास्त्रानुसार मेष, कर्क, कन्या आणि वृश्चिक राशीच्या लोकांवर शनीची वक्री दृष्टी पासून सावध राहायला हवं.  या लोकांना या काळात विशेष काळजी घ्यायला हवी. या राशीच्या लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावं लागणार आहे. इतकंच नाही तर या काळात आर्थिक क्षेत्रातील समस्या, व्यवसायात नुकसान, आरोग्याशी संबंधित समस्यांना उद्ध्भवणार आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना आजपासून खालील उपाय करावे. 

'या' उपायांमुळे शनीच्या वक्र दृष्टीचा प्रभाव होतो कमी 

- ज्योतिषशास्त्रानुसार शनीचा अशुभ प्रभाव दूर करण्यासाठी नियमितपणे हनुमानजीची पूजा करावी. यासोबतच भैरवाची पूजा केल्याने यांना विशेष फळ प्राप्त होतं.

-  शनिदेवाला शांत करण्यासाठी आणि शुभ प्रभावासाठी दररोज महामृत्युंजय मंत्राचा जप करणं फायदेशीर मानलं जातं. या मंत्राचा जप केल्याने जीवनातील अनेक समस्या दूर होतात. 

- शनिदेवाचा अशुभ प्रभाव दूर करून शुभ परिणाम प्राप्त करायचं असतील तर कावळ्यांना नियमित भाकरी खाऊ घालायला हवी. यासोबत सावली दानही करायला हवं. यासाठी शनिवार हा सर्वोत्तम दिवस मानला जातो. सावली दान करण्यासाठी एक वाटी मोहरीचे तेल घ्या आणि त्यात आपली सावली पहा. हे केल्यानंतर शनि मंदिरात हे तेल अर्पण करा. 

- याशिवाय शनिदेवाचा अशुभ प्रभाव टाळण्यासाठी मोठ्यांचा आदर करणे फायदेशीर मानलं जातं. यासोबतच गरजूंना अन्न, पैसे, कपडे इत्यादी दान करा केल्याने हा प्रभाव कमी होतो. यामुळे शनिदेव प्रसन्न होतात आणि सुख-समृद्धीचे आशीर्वाद देतो, अशी मान्यता आहे. 

हेसुद्धा वाचा - 'या' ग्रहाची महादशा असल्यास 20 वर्ष जगाल राजासारखं! दिवसरात्र पैशांचा पाऊस?

 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)