Conjunction Of Shani And Budh: वैदिक ज्योतिषशास्त्रात, प्रत्येक ग्रह ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी बुध ग्रहाला वाणी, व्यवसाय, दळणवळण आणि अर्थव्यवस्थेचा कारक मानलं जातं. याशिवाय शनिदेव न्याय देणारे मानले जातात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मंगळवारी कुंभ राशीमध्ये शनी आणि बुध यांचा संयोग झाला आहे. 20 फेब्रुवारीला बुध कुंभ राशीत प्रवेश करताच हा संयोग तयार झाला. यामुळे या संयोगाचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येणार आहे. या संयोगाचा काही राशींच्या व्यक्तींवर परिणाम होणार आहे. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.


मिथुन रास (Mithun Zodiac)


शनी आणि बुध यांच्या संयोगाने मिथुन राशीच्या लोकांसाठी चांगले दिवस सुरू होऊ शकतात. तुमची प्रलंबित कामं पूर्ण होऊ शकतात. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून प्रत्येक पावलावर पूर्ण पाठिंबा मिळेल. नोकरी आणि व्यावसायिकांच्या उत्पन्नात चांगली वाढ होणार आहे. जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हा काळ शुभ राहील. अनपेक्षित आर्थिक लाभही मिळू शकतो.


कुंभ रास (Kumbh Zodiac)


बुध आणि शनीचा संयोग तुमच्यासाठी शुभ ठरू शकतो. या काळात नोकरदार लोकांना कामाच्या ठिकाणी मान-सन्मान मिळेल. तुम्हाला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. ज्या विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घ्यायचे आहे त्यांची इच्छा पूर्ण होऊ शकते. अविवाहित लोकांना यावेळी नातेसंबंधाचा प्रस्ताव येऊ शकतो. भागीदारी व्यवसाय करणाऱ्यांना चांगला नफा मिळू शकतो.


मकर रास (Makar Zodiac)


मकर राशीच्या लोकांसाठी बुध आणि शनीचे संयोग फायदेशीर ठरू शकतो. या काळात जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांना तुम्हाला चांगल्या संधी मिळतील. तुम्हाला जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळू शकतात. तुम्ही तुमच्या करिअरमध्येही प्रगती कराल. बुध ग्रहाच्या प्रभावामुळे तुमच्या वाणीचा प्रभाव वाढणार आहे. 


( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )