Shani Asta 2024 :  ज्योतिषशास्त्रात शनि सर्वात महत्त्वाचा ग्रह मानला जातो. शनिदेव हा न्यायदेवता आणि सर्वात क्रूर ग्रह मानला जातो. शनिदेव हा सर्वात मंद गतीने आपल स्थान बदलतो. शनिदेवाच्या स्थितीमुळे 12 राशीच्या लोकांच्या जीवनावर प्रभाव पडतो. सध्या शनिदेव स्वगृहात कुंभ राशीत विराजमान आहे. नवीन वर्षात 2024 मध्येही शनिदेव कुंभ राशीत असणार आहे. नवीन वर्षात 2024 मध्ये शनि अस्त, उदय आणि वक्री होणार आहे. (saturn sets in aquarius 2024 these zodiac sign faces financial problems)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवीन वर्षात 2024 मधील 11 फेब्रुवारी ते 18 मार्च 2024 या काळात शनि अस्त म्हणजे मावळणार आहे. शनीच्या अस्तामुळे अनेक राशींच्या लोकांच्या आयुष्यात मोठी उलथापालथ होणार आहे. शनि अस्त काळात जास्त दिवस राहणार नाही. तरीदेखील या काळात काही राशीच्या लोकांनी काळजी घेण्याची गरज आहे. 


मेष (Aries Zodiac)


या राशीच्या अकराव्या घरात शनि विराजमान आहे. शनीच्या अस्तामुळे तुमच्या आयुष्यात अनेक अडचणी येणार आहे. गुंतवणूक करताना शंभर वेळा विचार करा. त्याशिवाय तुमच्या आर्थिक परिस्थितीवरही शनि अस्तामुळे विपरीत परिणाम होणार आहे. या काळात कुटुंबातही वादळ येण्याची शक्यता आहे. पण ही स्थिती 18 मार्चपर्यंत असणार आहे. शनि उदय झाला की तुमच्या आयुष्यातील समस्या दूर होतील. 


वृषभ (Taurus Zodiac)


या राशीच्या नवव्या आणि दहाव्या घराचा स्वामी शनि आहे. शनिदेव कुंभ राशीत असल्याने या राशीच्या दहाव्या घरात तो विराजमान आहे. अशा स्थितीत 2024 मध्ये फेब्रुवारी महिन्यात शनीची अस्त झाल्यामुळे या लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. या लोकांच्या आयुष्यात तणाव निर्माण होणार आहे. व्यवसायात समस्या येणार आहे. आरोग्याकडे या लोकांना विशेष लक्ष द्यावे लागणार आहे. शनि उदयानंतर या लोकांची परिस्थिती थोड सुधारेल. 


कन्या (Virgo Zodiac)


या राशीच्या सहाव्या आणि पाचव्या घराचा स्वामी शनिदेव आहे. या लोकांच्या कुंडलीतील सहाव्या घरात शनी विराजमान आहे. शनी अस्तामुळे या राशीच्या लोकांनी थोडं सावध राहण्याची गरज आहे. कठोर परिश्रम करुनही या लोकांना यश मिळणार नाही आहे. कुटुंबासोबत वादावादी होण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती थोडी कमजोर असेल. आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. 


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)