Shravan 2023 Horocope in Marathi:  यंदा श्रावण महिना अगदी खास असणार आहे. 19 वर्षांनंतर श्रावणात अनेक योग जुळून आले आहेत. उत्तर भारतीयांच्या श्रावणाला सुरुवात झाली असून महाराष्ट्रात श्रावण 18 जुलैपासून सुरु होणार आहे. श्रावणात दोन महिने भोलेनाथांची कृपा असणार आहे. कारण यंदा श्रावण दोन महिने आहे. याचा अर्थ यंदा 8 श्रावण सोमवार असेल. श्रावणासोबत अधिकमासचा आहे.  वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार काही राशींच्या व्यक्तींवर भोलेनाथाची कृपा बसरणार आहे. पण काही राशींच्या लोकांवर शंकर भगवानच्या तिसऱ्या डोळ्यातून क्रोध प्रगट होणार आहे. (sawan Lord Shankar anger will fall on these zodiac signs economic crisis will collapse sawan 2023 unlucky zodiac signs)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ यांच्यानुसार या राशींच्या व्यक्तींना आर्थिक हानीसोबतच अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. यामध्ये तुमची रास नाही ना पाहून घ्या. 


वृषभ (Taurus)


या राशीसाठी पुढील दोन महिने हे तणावग्रस्त असणार आहे. प्रकृतीमध्ये बिघड होणार असल्याने खर्च वाढणार आहे. शारीरिक आणि मानसिक स्थिती ढासळणार आहे. या दिवसांमध्ये शंकर भगवनाची पूजा करा. 


मकर (Capricorn)


मकर राशीसाठीही श्रावणाचे दोन महिने अतिशय कठीण असणार आहे. या राशीच्या लोकांनावर आर्थिक संकट कोसळणार आहे. कुठलाही आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्या अन्यथा मोठ्या संकटात पडू शकतात. यादिवसामध्ये खर्च जपून करा. 


तूळ (Libra)


या राशीच्या लोकांवरही भोलेनाथ नाराज असणार आहे. या राशीलासुद्धा वित्तहानीपासून आरोग्याची समस्या जाणवणार आहे. या लोकांना धावपळ करण्याची वेळ येत असली तरी करु नका. प्रकृतीमधील चढउतार तुम्हाला त्रासदायक ठरणार आहे. कुटुंबाकडे लक्ष द्या. 


कुंभ (Aquarius)


कुंभ राशीच्या लोकांसाठी श्रावण महिना अतिशय खराब जाणार आहे. या लोकांनी प्रत्येक गोष्टीबद्दल काळजी घ्यावी लागणार आहे. आरोग्याची समस्या जाणवणार आहे. करिअरमध्येही काही अडचणी येणार आहे. श्रावणातील दोन महिन्यात बाहेर जाण्याचा विचार असेल तर जाणं टाळा. अगदी कामानिमित्तही जायचं असेल तर घरुनच काम केलं तर उत्तम होईल. 


 


हेसुद्धा वाचा - श्रावणात 19 वर्षांनंतर दुर्मिळ योगायोग! 5 राशींवर 59 दिवस नोटांचा पाऊस; कोणावर असणार महादेवाची कृपा?


 


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)