Amavasya 2024 : हिंदू पंचांगानुसार अमावस्येनंतर नवीन महिन्याला सुरुवात होते. आज ज्येष्ठ महिन्यातील अमावस्या असून शनिवारपासून आषाढ महिन्याला सुरुवात होणार आहे. हिंदू धर्मात अमावस्या आणि पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. तर अमावस्या ही पितरांना आनंदी करण्यासाठी अतिशय महत्त्वाची मानली जाते. अमावस्येला शनिदेव कुंभ राशीत असून शश राजयोग निर्माण झाला आहे. त्यामुळे काही लोकांचं भाग्य उजळणार आहे. त्यात तुमची रास आहे का जाणून घ्या. (Shani Dev auspicious yoga on ashadha amavasya 2024 luck of these zodiac signs will be bright get money )


'या' राशींच्या लोकांसाठी अमावस्या शुभ!


कुंभ रास (Aquarius Zodiac) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या राशीच्या लोकांना दर्श अमावस्या शुभ असणार आहे. या लोकांना लाभच लाभ होणार आहे. तुम्हाला आजच्या दिवशी केलेल्या प्रत्येक कामात यश मिळणार आहे. अडकलेली कामं मार्गी लागणार आहे. मन आनंदी आणि प्रसन्न असणार आहे. तुमचा आत्मविश्वास द्विगुणीत होणार आहे. नोकरीच्या शोधत असणाऱ्यांना चांगली नोकरी मिळणार आहे. कुटुंबात आनंदाच वातावरण असणार आहे. नातेसंबंध अधिक मजबूत होणार आहे. 


मिथुन रास (Gemini Zodiac)


अमावस्या या राशीच्या लोकांसाठी अत्यंत शुभ सिद्ध होणार आहे. तुमच्या प्रगतीचा वेग झपाट्याने वाढणार आहे. अनेक मार्गाने तुमची प्रगती होणार असून उत्पन्नात घशघशीत वाढ होणार आहे. या राशीच्या लोकांवर जर शनीदेवाच्या साडेसातीचा किंवा ढैय्याचा अशुभ प्रभावपासून आराम मिळणार आहे. इतक्या दिवसांपासून मनावर जाणवणारा ताण कमी होणार आहे. नवीन लोकांची भेट आणि घरातील आनंद वातावरण तुमचं मन प्रसन्न होणार आहे. 


मकर रास (Capricorn Zodiac)   


दर्श अमावस्या या राशीच्या लोकांसाठी अनेक बाबींमधून विशेष सिद्ध होणार आहे. शश योगामुळे या लोकांना लाभ होणार आहे. त्यामुळे या राशीला दुहेरी फायदा मिळणार आहे. तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ लाभणार आहे. शिवाय आनंदाची बातमी कानावर पडणार आहे. उत्पन्नात वाढ होणार असून आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा अधिक मजबूत स्थितीत येणार आहे. कुटुंबातील सदस्यांसोबत संबंध चांगले होणार आहे. जोडीदारासोबत मनमोकळा संवाद नात्यांमध्ये मधुरता आणणार आहे. 


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)