Shani Gochar 2023 zodiac signs effect in marathi : ज्या एक ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशी प्रवेश करतो तेव्हा त्याचा परिणाम आपल्या आयुष्यावर दिसून येतो. काहीसाठी ग्रहांचं संक्रमण शुभ काळ घेऊन येतो तर काही लोकांसाठी अशुभ काळ घेऊन येतो. आज संकष्टी (Sankashti Chaturthi 2023 ) आहे शिवाय शनिवार म्हणजे दुहेरी योग...संकटमोचन यांना प्रसन्न करण्याचा दिवस... शनीदेवाची (saturn transit 2023) कृपा मिळणाचा दिवस...त्यात लवकरच शनी गोचर होणार आहे. यंदा 30 वर्षांनी महाभाग्य राजयोग (Mahabhagya Rajyog 2023) जुळून आला आहे. त्यामुळे ज्योतिषशास्त्रात हा काळ अतिशय शुभ मानला जातो आहे. या 15 मार्चला येणारा महाभाग्य राजयोगमुळे 4 राशीच्या लोकांचे भाग्य उजळणार आहे. (Shani Gochar 2023 Mahabhagya Rajyog zodiac signs effect get money and success astro news in marathi)


'या' राशींच्या लोकांना धनलाभ?


वृषभ (Taurus)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या राशीच्या लोकांसाठी महाभाग्य राजयोग (mahabhagya rajyog benefits) हा खूप शुभ काळ घेऊन येमार आहे. ते करिअरमध्ये उंच शिखर गाठणार आहेत, असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे. शिवाय धनलाभाचा योग आहे. विवाहइच्छुक लोकांचे विवाह ठरतील. तुमची आर्थिक स्थिती सुधारणार आणि मजबूत स्थितीत येईल. 


मिथुन (Gemini)


या राशीच्या लोकांसाठी महाभाग्य राजयोग हा धनलाभ घेऊन आला आहे. तुम्हाला वडिलोपार्जित संपत्तीतून फायदा होईल असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे. शिवाय अचानक धनलाभाचा योग आहे. तुमची आर्थिक स्थिती चांगली होणार आहे. 


कर्क (Cancer)


महाभाग्य राजयोगामुळे या राशीच्या लोकांचे चांगले दिवस सुरु होणार आहे, असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे. या लोकांना परदेशी दौऱ्याचे योग आहेत. व्यापाऱ्यात यांचा मोठा फायदा होईल. विद्यार्थ्यांना मेहनतीचं फळ मिळणार आहे. नवीन घर आणि कार खरेदीचे चांगले योग आहेत. 



धनु (Sagittarius)


तर या राशीच्या लोकांसाठी महाभाग्य राजयोग धनलाभ घेऊन आला आहे. आतापर्यंत केलेल्या मेहनतीला प्रगतीची जोड मिळणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार तुम्हाला उद्योगात मोठी संधी मिळणार आहे. नोकरदार वर्गासाठीही आनंदाची बातमी असणार आहे. बढती आणि पगारवाढचे संकेत आहेत. 


(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)