Shani Gochar 2023: कुंभ राशीत असलेला शनि शतभिषा नक्षत्रात पोहोचला आहे. ज्योतिष शास्त्राप्रमाणे राहूला शतभिषा नक्षत्राचा स्वामी म्हणून मानलं जातं. परंतु शतभिषा नक्षत्र कुंभ राशीच्या अंतर्गत येते असल्याने राशीचा स्वामी शनी असल्याचं म्हटलं जातं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्योतिषशास्त्रात असं सांगण्यात आलं आहे की, शतभिषा नक्षत्राच्या पहिल्या आणि शेवटच्या चरणाचा स्वामी गुरु आहे तर दुसऱ्या आणि तिसऱ्या चरणाचा स्वामी शनिदेव आहे. शतभिषा नक्षत्राच्या पहिल्या चरणात जन्मलेले लोक हुशार आणि कुशल  असतात. शतभिषा नक्षत्राच्या चौथ्या चरणात जन्मलेली व्यक्ती आनंदी असल्याचं समजलं जातं. 


दरम्यान यावेळी शनी 17 ऑक्टोबरपर्यंत शतभिषा नक्षत्राच्या पहिल्या चरणात राहणार असून चरणाचा स्वामी बृहस्पति आहे. अशा परिस्थितीत शनीच्या या परिवर्तनादरम्यान 17 ऑक्टोबरपर्यंत अनेक राशीच्या लोकांना त्यांच्या आयुष्यात जीवनात समस्यांना सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे. या राशी कोणत्या आहेत, ते जाणून घेऊया.


कर्क रास


या राशीच्या लोकांसाठी शतभिषा नक्षत्रात शनीचं परिवर्तन अनेक गोष्टींमध्ये त्रासदायक ठरणार आहे. यावेळी आरोग्याच्या बाबतीत चढ-उताराच्या स्थितीला सामोरं जावं लागू शकतं. अनेक कामं निघतील ज्यामुळे तुमचं आर्थिक बजेट फिस्कटू शकतं. काही व्यक्तींना या काळात अनावश्यक प्रवास करावा लागेल. खाण्यापिण्याच्या गोष्टींची काळजी घ्यावी. तुमच्यावर चुकीच्या गोष्टींचे आरोप केले जाऊ शकतात.


कुंभ रास


शनी हा तुमच्या राशीचा स्वामी मानला जातो. अशा परिस्थितीत ऑक्टोबरपर्यंतचा काळ या राशीच्या व्यक्तींसाठी बऱ्याच प्रमाणात अस्थिर मानला जाणार आहे. यावेळी तुम्हाला निर्णय घेणं कठीण होऊ शकतं. जोडीदारासोबत मोठा वाद होण्याची चिन्ह आहे. मुळात याचा परिणाम तुमच्या जीवनावरही होऊ शकतो. घरातील काही गोष्टींमुळे तुमचं मन अस्वस्थ होणार आहे, त्यामुळे काळजी घ्यावी.


मीन रास


मीन राशीच्या लोकांसाठी शतभिषा नक्षत्रात शनीचा संचार अनुकूल नाहीये. या राशीच्या व्यक्तींना ऑक्टोबरपर्यंत आरोग्याशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागेल. मु्ख्य म्हणजे, अपघात होण्याची शक्यता असल्याने कोणत्याही प्रकारचा धोका टाळावा. आर्थिक बाबतीत हा काळ चांगला नाहीये. अनेक अनावश्यक खर्चही येतील, ज्यांना टाळलं पाहिजे. शिवाय पार्टनरशी वाद होऊ शकतो. 


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)