Shani Gochar : वैदिक ज्योतिषशास्त्रात सूर्यदेव पूत्र शनिदेवाला विशेष स्थान आहे. ग्रह गोचर हा पृथ्वीतलासोबत मानवी जीवनावर परिणाम करतं. 9 ग्रह हे ठराविक वेळाला आपली स्थिती बदलत असतात. ग्रहांच्या या स्थितीबदलाला वैदिक ज्योतिषशास्त्रात ग्रह गोचर असं म्हटलं जातं. सध्या गणेशोत्सवाची धूम सुरु आहे. अनंत चतुदर्शीला बाप्पाला निरोप दिल्यानंतर पितृपक्षाला सुरुवात होईल. त्यानंतर नवरात्रीला सुरुवात होणार आहे. नवरात्रीचा पहिलाच दिवस हा शनि गोचर असल्याने काही राशींच्या लोकांसाठी नकारत्मक तर काहींसाठी सकारात्मक ठरणार आहे. (Shani Gochar Bad news for 5 zodiac signs problems will increase for these people)


मेष (Aries Zodiac)   


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शनिदेव सांगत आहेत लवकरात लवकर राग सोडा अन्यथा वाईट परिणामांना सामोरे जावा लागणार आहे. कारण 3 ऑक्टोबर 2024 पासून शनि महाराज पूर्वा भाद्रपद नक्षत्रापासून शतभिषा नक्षत्रात प्रवेश करणार आहे.. 27 डिसेंबर 2024 पर्यंत या नक्षत्रात राहणार आहे. या काळात कोणतेही चुकीचे काम करू नका.


मिथुन (Gemini Zodiac)


जीवनात पैशाची बचत करणे किती महत्त्वाचे आहे हे शनिदेव तुम्हाला सांगणार आहेत. या संक्रमण कालावधीत तुम्हाला तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवावे लागणार आहे. जर तुम्ही विवाहित नसाल तर प्रयत्न करा, तुम्हाला यश मिळू शकेल. मानसिक तणाव झपाट्याने वाढणार आहे. 


सिंह (Leo Zodiac) 


सूर्य हा शनिदेवाचा पिता असून तुमच्या राशीचा स्वामी सूर्य आहे. वडील आणि मुलामध्ये 36 चा आकडा असला तरी शनि महाराज तुम्हाला जास्त त्रास देण्याच्या मनस्थितीत नाहीत. येथे शनि शेअर बाजारातून लाभ देताना दिसत आहे. मात्र करिअरच्या बाबतीत काही चिंता निर्माण होऊ शकतात.


तूळ (Libra Zodiac) 


शनिदेवाची सर्वात आवडती राशी असेल तर ती तूळ आहे. या कारणास्तव, तुम्ही निश्चिंत राहा, मात्र जर तुम्ही कोणतेही चुकीचे काम केले तर शनि कठोर शिक्षा देण्यापासून थांबणार नाही. कोणाचीही फसवणूक करू नका आणि योग्य व्यक्तीचे समर्थन करा. मग बघा शनि तुमच्या आयुष्यात काय चमत्कार करतो.


कुंभ (Aquarius Zodiac) 


शनि सध्या तुमच्या राशीत स्थित आहे. शनि तुमच्या राशीचा स्वामी देखील आहे. आर्थिक लाभाची वेळ आहे. कॉन्ट्रॅक्टिंग केल्यास, अडकलेले पेमेंट क्लिअर होऊ शकते. व्यवसायात नवीन संपर्कातून तुमचे उत्पन्न वाढू वाढणार आहे. संपर्क किंवा मध्यस्थाची भूमिका बजावणाऱ्यांना फायदा होणार आहे. 


मीन  (Pisces Zodiac) 


शनिमुळे पैशाच्या बाबतीत काही अडचणी येऊ शकतात. पण जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा राजकारणाच्या क्षेत्राशी संबंधित असाल तर तुमच्यावर शनीच्या प्रतापाचा वर्षाव होणार आहे. तुमची प्रगती कोणीही रोखू शकणार नाही. कष्ट करा आणि गरीब लोकांना मदत करा, शनि असे चमत्कार दाखवेल ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल.


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)