Shani Sadesati 2023: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचा गोचर महत्त्वाचा असतो. ग्रहांची वक्री स्थिती आणि राशीत एकापेक्षा जास्त ग्रह एकत्र येत असल्याने होणारे शुभ-अशुभ योग यावर बऱ्याच घडामोडी अवलंबून असतात. त्या त्या घडामोडींनुसार 12 राशींवर परिणाम होत असतो. असं असलं तरी ज्योतिषांचं सर्व लक्ष शनि गोचराकडे (Shani Gochar) असतं. शनिदेव दर अडीच वर्षांनी राशी बदल करतात. ज्या राशीत प्रवेश करतात, त्या राशीच्या मागच्या आणि पुढच्या राशीवर साडेसातीचा (Shani Sadesati) प्रभाव असतो. तर काही राशी अडीचकीच्या (Shani Adichki) प्रभावाखाली देखील येतात. काही जणांवर शनिची महादशा, अंतर्दशा सुरु असते. त्यांच्यासाठी हा काळ खडतर जातो. शनिदेवांना नवग्रहांमध्ये न्यायदेवता म्हणून संबोधलं जातं. व्यक्तीच्या कर्मानुसार शनिदेव फळ देतात. 2023 या वर्षात शनिदेव गोचर करणार आहेत. त्यामुळे काही राशींची साडेसाती आणि अडीचकीतून मुक्तता होणार आहे. 


कुंभ राशीत गोचर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शनिदेव अडीच वर्षानंतर एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात. नवग्रहांमध्ये शनि सर्वात मंद गतीने गोचर करतात. शनिदेवांना राशीचक्र पूर्ण करण्यासाटी 30 वर्षांचा कालावधी लागतो. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला अडीचकी आणि साडेसातीतून जावं लागतं. शनिदेव सध्या मकर राशीत असून मार्गस्थ झाले आहेत. पुढच्या वर्षी 17 जानेवारी 2023 रोजी कुंभ राशीत प्रवेश करणार आहेत. या राशी गोचरांचा सर्व 12 राशींवर शुभ-अशुभ परिणाम दिसून येईल.


या राशींची साडेसाती आणि अडीचकी संपणार


शनिदेव 17 जानेवारी 2023 रोजी रात्री 8 वाजून 2 मिनिटांनी मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. या गोचरानंतर मिथुन आणि तूळ राशीची शनि अडीचकी संपेल. तसेच धनु राशीच्या लोकांना साडेसातीपासून सुटका मिळेल. त्यामुळे तीन राशींच्या अडचणी कमी होणार आहेत.


Eclipse 2023: पुढच्या वर्षी कोणत्या दिवशी सूर्य-चंद्र ग्रहण? सूतक पाळावं लागणार की नाही? जाणून घ्या


या राशींना साडेसाती आणि अडीचकी सुरु होणार


शनि गोचरामुळे मीन राशीला साडेसातीचं पहिलं चरण सुरु होणार आहे. त्याचबरोबर मकर राशीला शेवटची अडीच वर्षे आणि कुंभ राशीला मधली अडीच वर्षे सुरु होणार आहेत. त्याचबरोबर कर्क आणि वृश्चिक राशीवर अडीचकी सुरु होणार आहे. त्यामुळे या काळात सांभाळून राहणं आवश्यक आहे. शनिच्या प्रभावापासून वाचण्यासाठी शनिवारी उपाय करावेत.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)