Shani Margi 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रामध्ये शनी देवाची विशेष भूमिका मानली जाते. शनिदेवाला न्याय आणि कर्म देणारे मानले जाते. सर्व ग्रहांमध्ये शनि हा सर्वात संथ गतीचा ग्रह आहे. एका राशीतून दुसऱ्या राशीत बदल होण्यासाठी सुमारे अडीच वर्षे लागतात. ज्योतिषशास्त्रात ग्रहांचा अस्त आणि मार्गी अवस्था अत्यंत महत्त्वाची असल्याचं मानलं जातं. जेव्हा एखादा ग्रह मार्गी अवस्थेत जातो तेव्हा त्याचा सर्व राशींवर परिणाम होतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शनीदेवाने या वर्षाच्या सुरुवातीला मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश केला. आता वर्षभर ते या राशीत राहणार आहे. याशिवाय शनिदेव जूनमध्ये वक्री होते आणि आता येत्या नोव्हेंबर महिन्यात मार्गी होणार आहेत. जेव्हा शनीदेव मार्गी होतील तेव्हा काही राशीच्या लोकांवर त्याचा विशेष शुभ प्रभाव दिसून येईल. पाहूयात शनी मार्गीचा कोणत्या राशींवर परिणाम होणार आहे. 


सिंह रास


सिंह राशीच्या लोकांसाठी शनीच्या मार्गाचा विशेष प्रभाव दिसणार आहे. यावेळी तुमच्या राशीनुसार शश राजयोगही तयार होणार आहे. सकारात्मक परिणाम तुमच्या कौटुंबिक आणि वैवाहिक जीवनावर दिसून येणार आहे. या काळात तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ होऊ शकते. कामाच्या ठिकाणी प्रगती दिसून येईल. कोर्ट केसेसमध्ये तुमचा विजय होण्याची शक्यता आहे. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांना चांगला नफा मिळण्याचे संकेत आहेत. 


मकर रास


मकर राशीच्या लोकांसाठी शनीची वाटचाल खूप चांगली होणार आहे. तुम्हाला आर्थिक लाभाच्या खूप चांगल्या संधी मिळणार आहेत. नोकरीत बढती आणि उत्पन्नात वाढ दिसून येईल. एखाद्या विशिष्ट योजनेअंतर्गत यश मिळू शकते. नशिबाच्या चांगल्या पाठिंब्यामुळे चांगला नफा मिळेल. तुमच्या कामात चांगले यश मिळेल. तुम्ही तुमच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा पाहू शकता. नोकरीत फायदा होण्याची चिन्हे आहेत. 


वृषभ रास


वृषभ राशीच्या लोकांवर शनिदेवाची विशेष कृपा राहणार आहे. या काळात तुम्हाला चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. करिअर आणि बिझनेसमध्ये तुमची अफाट प्रगती दिसून येणार आहात. नोकरीच्या शोधात आहेत त्यांना चांगले यश मिळू शकते. तुमचे मन प्रसन्न राहील. व्यवसायात काम करणाऱ्यांना चांगल्या संधी मिळतील. घरात काही धार्मिक कार्यक्रम होऊ शकतात. 


( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )