Shani Margi 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार 9 ग्रहांमधील शनि ग्रह हा सर्वात महत्त्वाचा आणि प्रभावकारक मानला जातो. शनिदेव हा कर्म आणि न्यायदेवता म्हणून ओळखला जातो. शनिदेव एका राशीतून दुसऱ्या राशीत सर्वात संथ गतीने प्रवेश करतो. शनिदेव एका राशीत अडीच वर्ष राहत असतो. शनिदेव या वर्षाच्या सुरुवातीला स्वगृही कुंभ राशीत असून तो वक्री स्थितीतून आज प्रत्यक्ष मार्गी झाला आहे. तब्बल 140 वर्षांनंतर शनिदेव कुंभ राशीत मार्गी झाल्यामुळे काही राशींवर पैशांचा पाऊस होणार आहे. (Shani Margi before Diwali after almost 140 years There will be rain of money in the house of this zodiac sign)


दिवाळीपूर्वी 'या' राशी होणार लखपती


तूळ राशी (Libra Zodiac)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्योतिषशास्त्रानुसार या राशीच्या पाचव्या घरात शनिदेव मार्गी झाला आहे.  त्यामुळे तूळ राशीच्या लोकांना दिवाळीपूर्वीपासून येणार नवीन वर्ष 2024 पर्यंत अच्छे दिन अनुभवता येणार आहे. या राशीतील लोकांचं परदेशात जाण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे. संपत्ती आणि मालमत्तेशी सकारात्मक परिणाम दिसून येणार आहे. व्यवसायाशी संबंधित लोकांना दुप्पटीने नफा प्राप्त होणार आहे. या राशीतील लोकांना सरकारी कामातून फायदा होणार आहे. 


धनु राशी (Sagittarius Zodiac)


या राशीच्या तिसऱ्या घरात शनिदेव स्थानबद्ध आहे. त्यामुळे या राशीतील लोकं व्यवसायात उंच शिखर गाठणार आहेत. तुम्हाला सर्वत्र यश प्राप्त होणार आहे. शनिदेवाच्या कृपाने या राशीचे लोकं एखादं मोठं वाहन खरेदी करणार आहेत. या लोकांचं उत्पन्न वाढून आर्थिक स्थिती बळकट होणार आहे. नोकरदारांना दिवाळी बोनससह प्रमोशन मिळण्याची दाट शक्यता आहे. अगदी उत्पन्नात वाढ होणार आहे. 


मकर राशी (Capricorn Zodiac)


शनिदेव या राशीच्या दुसऱ्या घरात स्थानबद्ध आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना मोठा आर्थिक फायदा होणार आहे. या काळात या राशीच्या लोकांच्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहे. बेरोजगारांना नोकरीची संधी मिळणार आहे. आर्थिक प्राप्तीचे नवे मार्ग खुले होणार असल्याने घरात आनंदाचं वातावरण असणार आहे. घरात एखादं धार्मिक कार्य सोहळा रंगणार आहे. व्यवसायात लक्षणीय यश प्राप्त होणार आहे. कुटुंबामधून एखादी आनंदाची बातमी कानी पडणार आहे. त्यामुळे घरात आनंदाचं प्रसन्न वातावरण असणार आहे. 


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)