Shani And Mangal Conjunction In Kumbh: ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. ज्यावेळी ग्रह राशी बदलतात त्यावेळी त्यांचा इतर ग्रहांशी संयोग होतो. शनिदेव सध्या कुंभ राशीत भ्रमण करत आहेत. मार्चमध्ये ग्रहांचा सेनापती मंगळ कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे कुंभ राशीमध्ये मंगळ आणि शनीचा संयोग तयार होईल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शनी आणि मंगळाच्या संयोगाने काही राशींच्या आयुष्यात आनंदाचे क्षण येणार आहेत. यावेळी आर्थिक फायदा होणार असून कुटुंबात सर्वकाही ठीक होणार आहे. करिअर आणि व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता आहे. जाणून घेऊया शनी आणि मंगळाच्या युतीमुळे कोणत्या राशींच्या व्यक्तींना लाभ मिळणार आहे.


मकर रास (Makar Zodiac)


मंगळ आणि शनीचा संयोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. या काळात तुम्हाला अनपेक्षित पैसे मिळू शकतात. गुंतवणुकीमुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. तुमचे अडकलेले पैसे परत मिळू शकतात. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. सरकारी क्षेत्राशी संबंधित सर्व कामे सहज पूर्ण होतील तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे. करिअर आणि व्यवसायाच्या बाबतीतही तुम्हाला उत्कृष्ट परिणाम मिळणार आहे. 


तूळ रास (Tula Zodiac)


तूळ राशीच्या लोकांसाठी मंगळ आणि शनीचा संयोग शुभ ठरू शकणार आहे. तुम्हाला तुमच्या मुलाच्या प्रगतीशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. संपत्ती मिळवण्याच्या तुमच्या इच्छा पूर्ण होतील. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली तुमची काही कामे पूर्ण होण्याचीही शक्यता आहे. जर तुम्ही प्रेमसंबंधात असाल तर तुम्हाला त्यात यश मिळू शकते. नोकरदार लोकांना अधिकारी आणि सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. 


मेष रास (Aries Zodiac)


मंगळ आणि शनीचा योग तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकणार आहे. तुमच्या बँक बॅलन्समध्ये चांगली वाढ होईल. तुम्ही तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी काही मालमत्तेत गुंतवणूक करू शकता. विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन यावेळी खूप छान असेल. या काळात तुम्हाला जुन्या गुंतवणुकीतूनही फायदा होईल. तुम्हाला कुठेतरी अडकलेले पैसेही मिळतील.  शेअर बाजार आणि लॉटरीमध्ये पैसे गुंतवायचे असतील तर वेळ चांगली आहे. 


( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )