Shani Nakshatra Transit: वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह त्याच्या ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. त्याचप्रमाणे ग्रह नक्षत्रात देखील बदल करतात. येत्या आश्विन महिन्याच्या पहिल्या दिवशी शनिदेव धनिष्ठा नक्षत्रात प्रवेश करणार आहेत. धनिष्ठा नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्तीवर मंगळ आणि शनीच्या प्रभाव पडतो. शास्त्रानुसार, 15 ऑक्टोबरला शनी नक्षत्र बदलणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान शनीदेव बरोबर नवरात्रीच्या एक दिवस अगोदर नक्षत्र गोचर करणार आहेत. यावेळी काही राशी अशा आहेत, ज्यांना या शनी नक्षत्र गोचरचा सकारात्मक परिणाम दिसून येणार आहे. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत. 


मेष रास


कर्माचे दाता मेष राशीच्या लोकांना पूर्ण सहकार्य करतील. राजकारणात पुढे येण्याची संधी मिळेल. कोणाशी असलेल्‍या तक्रारी दूर होतील. कार्यालयात वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. नोकरी प्रोफाइलमध्ये योग्य बदल दिसतील.  करिअरमध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे. करिअरच्या प्रगतीसाठी जबरदस्त मार्ग उघडणार आहे. 


मिथुन रास


मिथुन राशीच्या 9व्या घरात शनि आहे. त्यामुळे व्यवसाय आणि नोकरीत यश निश्चित आहे. कामानिमित्त प्रवास होईल. आरोग्यही चांगले राहणार आहे. या काळात तुम्हाला गुंतवणुकीचा फायदा होऊ शकणार आहे. कर्माचे वर्चस्व असल्यामुळे नशीब वरचढ राहणार आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांनाही अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. कोर्ट- कोर्ट केसेसमध्ये तुमच्या बाजूने निर्णय येऊ शकतो.  


वृश्चिक रास


शनीच्या कृपेने कौटुंबिक वाद मिटणार आहे. न्यायालयीन निर्णयात यश मिळू शकणार आहे. तुम्हाला एक मौल्यवान भेट मिळू शकते. नातेसंबंध विवाहापर्यंत जाण्याची शक्यता आहे. प्रेमप्रकरणात अधिक गोडवा राहील. शारीरिक आणि मानसिक ऊर्जा वाढेल. यश मिळविण्यासाठी हा काळ खूप चांगला मानला जातो. स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर यश मिळण्याची शक्यता आहे. तुमची प्रलंबित कामं पूर्ण होणार आहे.


( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )