Shani Rahu Yuti : ज्योतिष शास्त्रात शनी आणि राहूला खूप महत्त्व ग्रह आहे. हे दोन ग्रह जेव्हा आपली स्थिती बदलतात तेव्हा त्याचा परिणाम सर्व राशींवर होतो. हे दोन ग्रह अतिशय प्रभावशाली आहे. ज्या राशींवर यांचा चांगला प्रभाव पडतो ते सुखी असतात. पण जर तुमच्या कुंडलीत शनी आणि राहूची वक्रदृष्टी असेल तर त्या जाचकावर संकट कोसळतं. राहू आणि शनि यांच्या युतीमुळे 17 ऑक्टोबरपर्यंत शनी शतभिषा नक्षत्रात राहणार आहे.  या दोघांची अशुभ युतीतून पिशाच योग तयार होतो आहे. यामुळे काही राशींना 17 ऑक्टोबरपर्यंत विशेष काळजी घेण्याची गरज आहे.  (Shani Rahu Yuti created Pishach Yoga these 4 zodiac signs destroy life astro tips)


कन्या


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शनी आणि राहूच्या शतभिषा नक्षत्रामुळे कन्या राशीला सर्वाधिक सावध राहवं लागणार आहे. या राशीच्या लोकांवर शनिदेवाची नजर कायम असते. अशा परिस्थितीत या लोकांच्या उत्पन्नापेक्षा जास्त म्हणजे दुप्पट खर्च होणार आहे. त्याचबरोबर कोणत्याही संकटातही ते सापडू शकतात. म्हणूनच त्यांना 17 ऑक्टोबरपर्यंत काळजीपूर्वक राहायचं आहे.  या लोकांना आर्थिक फटका बसणार आहे. मेहनत करुनही कामात अपयश मिळेल.  मानसिक तणावात ही लोक असणार आहेत. 


वृश्चिक


वृश्चिक राशीच्या लोकांना शनी राहुच्या संयोगामुळे छोटे-मोठे नुकसान सहन करावे लागणार आहे.  प्रेमसंबंधात मतभेद होऊन वाद होणार आहे. या लोकांनीही 17 ऑक्टोबरपर्यंत सर्तक राहण्याची गरज आहे. शनी राहूची युती त्यांच्यासाठी घातक ठरणार आहे. त्यासोबतच या लोकांना आर्थिक फटका बसणार आहे. 


कर्क 


कर्क राशीच्या लोकांवर शनीची सावली पडली आहे. यामुळे त्यांच्या आधीच संकट कोसळलं आहे. त्यात आता शनी आणि राहूच्या संयोगामुळे त्यांच्या नुकसानात अधिक वाढ होणार आहे.  कशातही गुंतवणूक केल्यास त्यातही त्यांना आर्थिक फटका बसणार आहे. म्हणूनच त्यांनी 17 ऑक्टोबरपर्यंत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. तोपर्यंतचा काळ त्यांच्यासाठी घातक आहे. 


कुंभ


कुंभ राशीच्या लोकांसाठीही ऑक्टोबरपर्यंतचा काळ कठीण असणार आहे.  या लोकांनी सावध राहण्याची अतिशय गरज आहे. त्याच्या कुटुंबातील लोकांनाही धक्का बसणार आहे. त्याचबरोबर जोडीदाराशी भांडण होण्याचीही शक्यता आहे, नातेसंबंधात तणाव येणार आहे. 


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)