Shani Surya Yuti 2024 : मकर संक्रांतीपासून सूर्यदेव मकर राशीत विराजमान आहे. पण फेब्रुवारी महिन्यात तो कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे मकर राशी शनिदेवाची रास मानली जाते. तर शनि हा कुंभ राशीचा स्वामी आहे. शनिदेव सध्या कुंभ राशीत अडीच वर्षांसाठी स्वगृहात ठाण मांडून विराजमान आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य हे शनिदेवाचे पिता आहे. त्यात या दोघांमध्ये वैर आहे. अशा स्थितीत फेब्रुवारी महिन्यात शत्रू पिता पुत्र कुंभ राशीत भेटणार आहे. यामुळे शनि आणि सूर्याची वक्रदृष्टी ही काही राशींवर पडणार आहे. त्यांच्या आयुष्यात महिन्याभर वादळ असणार आहे. (Shani Surya Yuti After 30 Years Shani Sun Conjunction in Aquarius The storm that will come in the life of  these people)


कर्क रास  (Cancer Zodiac)   


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अष्टम स्थानात असलेल्या शनि आणि सूर्याची युती तुम्हाला अशुभ फळं देणार आहे. तुम्हाला यश मिळवण्यासाठी फार मेहनत करावी लागणार आहे. तरीदेखील अपेक्षित यश मिळणार नाही. महिनाभर या योग तुमच्यासाठी त्रासदायक ठरणार आहे. सूर्य गोचर तुमच्या आयुष्यात वादळ आणणार आहे. घरात विनाकारण भांड्याला भांडं लागणार आहे. 


हेसुद्धा वाचा - Shani Uday : 30 वर्षांनंतर कर्मदाता शनिदेव कुंभ राशीत होणार उदय! 'या' राशींना धनवृद्धीसह लाभच लाभ


सिंह रास (Leo Zodiac) 


या राशीच्या सप्तम स्थानात शनि आणि सूर्याची युती तुम्हाला त्रासदायक ठरणार आहे. या युतीमुळे महिन्याभर तुम्हाला सतर्क राहावं लागणार आहे. कौटुंबिक पातळीवर एका पाठोपाठ एक अडचणींना तुम्हाला तोंड द्यावे लागणार आहे. त्यामुळे घरातील वातावरण तणावपूर्ण असणार आहे. त्यामुळे महिन्याभर तुम्ही अस्वस्थ असणार आहात. 


वृश्चिक रास (Scorpio Zodiac)  


या राशीच्या चतुर्थ स्थानात शनि आणि सूर्याची युती तुम्हाला संकटात टाकणार आहे . शनिची अडीचकी सुरु असताना शत्रू पिता ग्रहासोबत युती तुम्हाला त्रासदायक ठरणार आहे. त्यामुळे कौटुंबिक स्तरावर अनेक संकटांच्या सामना तुम्हाला करावा लागणार आहे. या महिन्याभरात एखाद्याची प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे. घरात वादविवाद होणार आहे. 


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)