Shash Rajyog 2023 : न्यायदेवता आणि वैदिक ज्योतिषशास्त्रातील महत्त्वाचा ग्रह शनीदेव 30 वर्षांनंतर कुंडलीत राजयोग तयार करत आहे. त्रिकोण राजयोग आणि शशराज योग हा काही राशींच्या घरात पैशांचा पाऊस पाडणार आहे. शनी देवत हा संथ ग्रह म्हणून पण ओळखला जातो. कारण तो एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी अडीच वर्ष लावतो. शनिदेव जाचकाला कर्माचं फळ देतो. त्यामुळे शनीदेवाचं नाव घेतलं की भल्या भल्या माणसाला घाम फुटतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शनि या वर्षांच्या सुरुवातीला 17 जानेवारीला कुंभ राशीत संक्रमण केलं आहे. कुंभ राशीत शनिदेव मार्च 2025 पर्यंत विराजमान राहणार आहे. पण त्या पूर्वी शनि आपली उलटी चाल चलणार आहे. तो 17 जूनला शनी वक्री होऊन उलट चालणे सुरु करणार आहे. शनिला हा चाल पूर्ण करायला 4 नोव्हेंबर उजाडणार आहे. शनी वक्रीमुळे काही राशींच्या कुंडलीत केंद्र त्रिकोण राजयोग तर काही राशींच्या शशराज योग जुळून आला आहे. शशराज योगामुळे 3 राशींच्या लोकांचं भाग्य अपार संपत्ती असणार आहे. चला जाणून घेऊयात कुठले आहेत त्या राशी (shani vakri 2023 in kumbh making shasha rajyog and Kendra Trikon Rajyog crores of money)


'या' राशींना लागणार बंपर लॉटरी


सिंह (Leo)


वक्री शनिमुळे तयार होणाऱ्या शशराज योगामुळे सिंह राशीच्या लोकांना भाग्यशाली ठरणार आहे.  वेगवेगळ्या मार्गाने धनलाभाचे योग आहेत. तुमच्या तिजोरी किंवा बँकेत पैसेच पैसे असणार आहे. वैवाहिक जीवनात आनंद असणार आहे. करिअरमध्ये नवीन संधी मिळणार आहे.  विवाह इच्छुकांचे लग्न ठरणारचे योग आहेत. 


वृश्चिक (Scorpio)


वक्री शनिमुळे षष्ठ राजयोग हा वृश्चिक राशीच्या लोकांसाठी फलदायी ठरणार आहे. वर्षांनूवर्षे सुरु असलेल्या अडचणीतून त्यांची सुटका होणार आहे. तुम्ही नोकरीच्या शोधात असेल तर ती संधी चालून येणार आहे. मालमत्ता, घर किंवा कार खरेदीचे योग ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आल आहेत.  अचानक धनलाभ होणार आहे. 


कुंभ (Aquarius)


या राशीला सर्वाधिक फायदा होणार आहे. कारण शनि कुंभ राशीत असून शश राजयोग त्याचा कुंडलीत तयार होत आहे. या राजयोगामुळे त्यांना अपार संपत्ती मिळणार आहे.  अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या समस्या मार्गी लागणार आहेत. नोकरीची ऑफर मिळणार आहे. या दिवसांमध्ये लोक तुमच्याकडे आकर्षित होणार आहेत. 


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)