Shani Vakri Effect 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रात ग्रह गोचरला अतिशय महत्त्व आहे. शनि ग्रह जेव्हा आपली स्थिती बदलतो तेव्हा याचा परिणाम 12 राशींवर दिसून येतो. शनिदेव हा कर्मदेवा आहे. तो जाचकाला त्याचा कर्माची फळं देतो. चांगले कर्म असेल तर शनिदेव प्रसन्न होतो. जर तुम्ही वाईट कर्म केले असतील तर शनिदेवाच्या कोपाला तुम्हाला सामोरे जावं लागते. शनि देव आता त्याची स्थिती बदलणार आहे. शनि लवकरच उलटी चाल चालणार आहे. तब्बल 30 वर्षांनी शनिदेव कुंभ राशीत वक्री स्थित येणार आहे. 


कधी आहे शनी वक्री?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंचांगानुसार पंचांगानुसार 17 जूनला रात्री 10.48 वाजता शनिदेव कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. शनिदेवाच्या वक्री स्थितीमुळे अनेक शुभ आणि अशुभ योग तयार होत आहे. या स्थिती शनिच्या उलट्या चालीमुळे केंद्र त्रिकोण हा अद्भुत राजयोग जुळून आला आहे. या केंद्र त्रिकोण राजयोगामुळे कोणत्या राशींवर सकारात्मक परिणाम दिसून येणार आहे, ते जाणून घेऊयात. (shani vakri 2023 makes kendra trikone rajyog  17 june 4 zodiac sign get immense money)


'या' राशींवर शनिदेव होणार प्रसन्न


मेष (Aries)


शनि वक्रीमुळे निर्माण झालेल्या केंद्र त्रिकोण राजयोगाचा या राशींना फायदा होणार आहे. कामाच्या ठिकाणी धनलाभाचे योग आहे. कार्यक्षेत्रात प्रमोशनचे योग आहेत. अचानक धनलाभाचे योग जुळून आले आहेत. 


वृषभ (Taurus)


या राशीच्या लोकांना केंद्र त्रिकोण राजयोग अतिशय भाग्यशाली सिद्ध होणार आहे. कामाच्या ठिकाणी पगार वाढ होण्याची दाट शक्यता आहे. कुटुंबाकडून आनंदाची बातमी मिळणार आहे. अडकलेली कामं मार्गी लागणार आहात. उत्पन्नाचे अनेक मार्ग चालून येणार आहे. जोडीदारासोबत नातं मजबूत होणार आहे. 


सिंह (Leo)


शनि वक्रीमुळे केंद्र त्रिकोण राजयोग हा या राशीच्या लोकांसाठी शुभ ठरणार आहे. आर्थिक क्षेत्रात त्यांची प्रगती होणार आहे. लक्ष्मी माता तुमच्यावर प्रसन्न असणार आहे. प्रत्येक कामात यश मिळणार आहे. नवं नवीन संधी चालून येणार आहे. 


मकर (Capricorn)


या राशीच्या लोकांसाठी केंद्र त्रिकोण राजयोग अतिशय लाभदायक ठरणार आहे. या लोकांचं बँक बँलेन्स मजबूत स्थिती येणार आहे. समाजात मान सन्मान वाढणार आहे. अपार संपत्तीचे योग तुमच्या कुंडलीत जुळून आले आहेत. 


( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )