Shani Vakri : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, शनिदेव (Shani Dev) न्यायदेवता आणि कर्मदाता म्हणून ओळखला जातो. शनिदेव हा सर्वात संथ गतीने आपली स्थिती बदलतो. तो एका राशीत अडीच वर्ष विराजमान असतो. सध्या शनिदेव स्वगृही कुंभ राशीत विराजमान आहे. अशा स्थिती तो वेळोवेळी आपली स्थिती बदलत असतो. शनिदेवची कुंडलीतील स्थिती अनेक वेळा शुभ किंवा चांगले फळ देते. सध्या शनि येत्या 30 जूनला मध्यरात्री 12 वाजून 35 मिनिटांनी शनी कुंभ राशीत उलटी चाल चालणार आहे. त्यामुळे काही राशींसाठी तो संकटाचा ठरणार आहे. शनी पुढचे 139 दिवस वक्री अवस्थेत असल्याने या लोकांवर अनेक संकट कोसळणार आहे, असं ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ सांगतात. (Shani Vakri or Saturn problem for these zodiac signs financial loss with mental stress)


वृषभ रास (Taurus)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्योतिष शास्त्रानुसार, शनीच्या कुंभ राशीत वक्री चाल ही या राशीच्या लोकांसाठी धोकादायक ठरणार आहे.  तुमच्या कार्यक्षेत्रावर याचा प्रभाव वाईट परिणाम दिसून येणार आहे. या दरम्यान वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर तुमचे मतभेद वाढण्याची शक्यता आहे. तुमच्या करिअरमध्ये चढ-उतार पाहिला मिळणार आहे. कोणत्याही वाद-विवादापासून दूर राहणे हे तुमच्यासाठी हिताच ठरेल. त्यासोबतच तुम्ही कुटुंबातील सदस्यांबरोबर जपून व्यवहार करा अन्यथा नातेसंबंधांवर वाईट परिणाम होतील. 


कर्क रास (Cancer)


शनिदेवाची व्रकी चाल ही कर्क राशीच्या लोकांसाठी चांगली नसणार आहे. 30 जूननंतर या लोकांनी पुढील  139 दिवस वाहन जपून चालवावे. शक्य झाल्यास वाहन चालवणे टाळा. तसंच, कामाप्रती तुम्ही कोणताही निष्काळजीपणा महागात पडू शकतं. नोकरदार वर्गातील लोकांना कामाच्या ठिकाणी मानसिक तणाव जाणवरणार आहे. तसंच, तुमच्या आरोग्यावर देखील याचा परिणाम होणार आहे. 


सिंह रास (Leo)


शनिदेव 30 जूनला वक्री स्थितीत आल्यानंतर या लोकांवर याचा फार गंभीर परिणाम पाहिला मिळणार आहे. या दरम्यान तुमच्या कार्यक्षेत्राबरोबरच तुमच्या वैवाहिक जीवनाताही अडथळे येणार आहेत. या काळात तुम्ही रागावर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे. अन्यथा तुमच्या हातातून अनेक कामे निसटण्याची शक्यता आहे. 


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)