Shani Uday 2024: ज्योतिषशास्त्रानुसार, एका ठराविक वेळेनंतर ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी नऊ ग्रहांमध्ये शनि हा सर्वात क्रूर ग्रह मानला जातो. कर्म देणारा आणि न्याय देणारा शनि लोकांना त्यांच्या कर्मानुसार फळ देतो. न्यायाची देवता शनि एका राशीत सुमारे अडीच वर्षे राहतो. यावेळी शनी त्याच्या मूळ त्रिकोण राशी कुंभ राशीत स्थित आहे आणि 2025 पर्यंत या राशीत राहील. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शनी इतक्याच गोचर करणार नसला तरीही त्याचा उदय होणार आहे. 18 मार्च 2024 रोजी सकाळी 7:49 वाजता शनीचा उदय होणार आहे. शनीच्या उदयामुळे अनेक राशीच्या लोकांच्या आयुष्यात आनंद येऊ शकतो, मात्र याचवेळी शनीचा उदय काही राशींच्या लोकांसाठी धोकादायक ठरू शकतो. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.


वृश्चिक रास (Vraschik Zodiac)


या राशीमध्ये शनि चतुर्थ भावात उदय होणार आहे. या राशीच्या लोकांनी त्यांच्या पालकांच्या आरोग्याची अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. लोकांमध्ये आत्मविश्वास भरलेला असावा.  नातेवाईकांशी तुमचे संबंध बिघडू शकतात. अतिआत्मविश्वासामुळे तुम्हाला अडचणीत येऊ शकते. तुमच्या मेहनतीचे फळ कोणीतरी काढून घेईल. तुम्हाला एखादे वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्याची संधी मिळू शकते. जीवनशैलीत थोडासा बदल करणे खूप महत्वाचे आहे.


कर्क रास (Kark Zodiac)


या राशीमध्ये शनि आठव्या भावात उदय होणार आहे. तुम्ही एखाद्या गंभीर आजाराला बळी पडू शकता. तसेच कामाच्या ठिकाणी बेफिकीर राहू नका. यासोबतच थोडी काळजी घ्या. प्रगती आणि फायद्यासाठी शॉर्ट कटचा अवलंब करू नका. तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. नशीब पूर्ण साथ देणार नाही. यावेळी आरोग्याची काळजी घ्यावी. तुम्हाला कामाच्या ठिकाणी काही आव्हानांनाही सामोरं जावं लागेल.


मीन रास (Meen Zodiac)


या राशीच्या बाराव्या घरात शनिचा उदय होणार आहे. यावेळी किरकोळ आजारांकडे दुर्लक्ष करणे टाळा. अशा परिस्थितीत तुम्ही जास्त खर्च कराल. अनावश्यक खर्च टाळण्याचा प्रयत्न करा. घरातील वृद्धांचीही काळजी घ्या. नोकरीत पदोन्नती किंवा वेतनवाढीसाठी तुम्हाला आणखी थोडी प्रतीक्षा करावी लागू शकते. काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तुमच्या जोडीदाराशीही मतभेद होऊ शकतात.


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)