Saturn Planet Gochar In Kumbh: ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह ठराविक कालावधीनंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतो. यामध्ये शनिदेव सर्व ग्रहांमध्ये सर्वात मंद गतीने भ्रमण करतात. म्हणजेच शनिदेवाचा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश होण्यासाठी सुमारे अडीच वर्षे लागतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शनी ग्रहाने मार्च 2023 मध्ये कुंभ राशीत गोचर केलं होतं. यावेळी 2025 पर्यंत शनी देव कुंभ राशीत राहणार आहेत. अशा स्थितीत शनिदेव 3 राशीच्या लोकांचे भाग्य उजळवू शकतात. म्हणजेच या राशींवर शनिदेवाची विशेष कृपा असणार आहे. जाणून घेऊया शनी देवांच्या गोचरमुळे कोणत्या राशींचं भाग्य उजळणार आहे.


कुंभ रास (Kumbh Zodiac)


शनिदेवाचं गोचर तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. 2025 पर्यंतच शनिदेव तुमच्या राशीत भ्रमण करणार आहेत. यावेळी तुमचे व्यक्तिमत्व सुधारणार आहे. समाजात तुमचा मान-प्रतिष्ठा वाढणार आहे. या काळात तुम्ही महत्त्वाच्या लोकांशी संबंध प्रस्थापित कराल. तुम्हाला परदेशातून आर्थिक लाभही मिळू शकतो. तुमच्या जोडीदाराकडूनही पूर्ण सहकार्य मिळेल. भागीदारीच्या कामात यश मिळू शकणार आहे. 


तूळ रास (Tula Zodiac)


शनिदेवाच्या राशीतील बदल तुमच्यासाठी शुभ सिद्ध होणार आहे. शनिदेव तुमच्या राशीतून पाचव्या भावात भ्रमण करत असून ते 2025 पर्यंत तेथेच राहतील. यावेळी तुम्हाला तुमच्या मुलांकडून चांगली बातमी मिळू शकते. प्रेमसंबंधांमध्ये यश मिळू शकतं. व्यवसाय असेल तर तुम्हाला यावेळी चांगल्या ऑर्डर मिळू शकतात. यावेळी तुम्हाला शेअर बाजार आणि लॉटरीमधून अनपेक्षित नफा मिळू शकतो. वडिलोपार्जित संपत्तीचा लाभ मिळेल.


मिथुन रास (Mithun Zodiac)


शनिदेवाचं गोचर तुमच्यासाठी वरदानापेक्षा कमी नाही. यावेळी नशीब तुमच्या पाठीशी असणार आहे. नोकरदार लोकांना नोकरीमध्ये चांगला अनुभव मिळेल. कामाच्या ठिकाणी वातावरण तुमच्यासाठी अनुकूल असेल. व्यावसायिकांना चांगला आर्थिक नफा मिळू शकतो. तुम्ही देश-विदेशात सहलीला जाऊ शकता. स्पर्धात्मक विद्यार्थ्यांसाठी हा काळ उत्तम राहणार आहे. यावेळी तुम्ही धार्मिक कार्यात सहभागी होऊ शकता. 


( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )