मुंबई : ज्योतिष शास्त्रामध्ये 9 ग्रह आणि 27 नक्षत्रांच्या आधारे 12 राशीच्या लोकांचा स्वभाव आणि भविष्य निश्चित केलं जातं. सर्व 12 राशीच्या लोकांचा स्वभाव, वागणूक आणि भविष्य वेगवेगळे असतं. याशिवाय लोकांच्या आवडी-निवडीही वेगवेगळ्या असतात. काही राशींच्या व्यक्तींचा स्वभाव शांत असतो, तर काहींचा रागीट, असे देखील काही असतात ज्यांचं नशीब चांगलं असते. काही राशींच्या व्यक्तींवर देवाची विशेष कृपा असते. अशा राशींच्या व्यक्तींबद्दल आपण जाणून घेवू...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कुंभ
कुंभ राशीचे लोक खूप प्रभावशाली असतात. जिद्दी स्वभावामुळे राशीचे लोक काम पूर्ण करूनच घेतात. न्यायाची देवता शनिदेवाची या राशीवर विशेष कृपा असते. यामुळेच कुंभ राशीचे लोक मेहनत करून वर्चस्व गाजवतात.


मकर
मकर राशीच्या लोकांवर शनिदेवाची कृपा असते. शनिदेवाच्या कृपेने या राशीचे लोक खूप मेहनती आणि उत्साही असतात. तसेच या राशीचे लोक आपले काम वेळेपूर्वी पूर्ण करण्यावर विश्वास ठेवतात. मेहनती असल्यामुळे या राशीच्या लोकांना शनिदेवाची कृपा राहते.


कन्या 
कन्या राशीचे लोक खूप मेहनती असतात. तसेच या राशीचे लोक मनमिळाऊ स्वभावाचे असतात. सर्वात मोठ्या आव्हानांना धैर्याने सामोरे जातात. यामुळे या राशीचे लोक आयुष्यात खूप प्रगती करतात. कन्या राशीचे लोक व्यवसायात चपळ असतात. 


शनिदेवाची कृपा कशी मिळवावी?
शनिदेवाला न्यायाधीश मानले जातं. व्यक्तीने केलेले कार्य आणि त्याचे फळ यामागे शनिदेवाचा हात असतो. व्यक्तीचे जीवनमान, रोग आणि संघर्ष शनिद्वारे निश्चित केला जातो.


शनिदेवाला प्रसन्न करून मनुष्य जीवनातील दुःख कमी करू शकतो. यासोबतच तुम्हाला करिअर आणि पैशाच्या बाबतीतही यश मिळू शकते. 


(वरील माहिती सर्वसामान्य समजुतींवर आधारित आहे, झी 24 तास याची खातरजमा करत नाही)