Shaniwar upay for harmony in relations, creating wealth and remedies for business : भाद्रपद महिन्याच्या नवमीला शनिवार येतोय. हिंदू पंचांगानुसार 20 ऑगस्ट रोजी सकाळी 1 वाजून 8 मिनिटांपर्यंत नवमी आहे. यानंतर रात्री 9 वाजून 42 मिनिटांपर्यंत व्याघात योग असणार आहे. हा योग महत्त्वाच्या कामांसाठी अशुभ मानला जातो. व्याघात म्हणजेच कोणत्याही प्रकारचा आघात. जोतिष शात्रानुसार या वेळेत कोणतंही काम केल्यास त्यात अडथळे निर्माण होतात आणि नुकसान देखील होऊ शकतं. म्हणूनच या काळात कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी विचार करून केल्या पाहिजेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुम्हाला तुमच्या व्यवसाय किंवा धंद्यात प्रगती पाहिजे असेल तर तुम्ही शनिवारी काही खास गोष्टी करू शकतात. यामुळे तुम्हाला मदत होऊ शकेल. आयुष्यात सफलता मिळवण्यासाठी, नोकरीत भरभराट मिळवण्यासाठी, तुमच्या मुलांना परदेशात पाठवण्यात काही अडचणी येत असतील तर हे उपाय तुम्हाला फायद्याचे ठरू शकतात. 


- तुमच्या आणि तुमच्या पार्टनरच्या रिलेशनमध्ये तणाव निर्माण झाला असेल तर शनिवारी एक खायचं पान घ्या. त्यावार काथ लावा. या पानाची घडी घाला. हे पान एका सफेद कागदात ठेऊन हनुमानाच्या देवळात ठेऊन द्या. याने नात्यांमध्ये मधुरता येते. 


- जर तुम्हाला कोणतीही गोष्ट विसरण्याची सवय असेल, एखाद्या ठिकाणी सामान ठेवून तुम्ही विसरत असाल, तर शनिवारी संध्याकाळी तुम्ही चंद्राला नमस्कार करू शकतात. सोबतच तुम्ही चांदीचा चंद्रमा धारण करू शकतात. 


- छान आणि स्वस्थ जीवनासाठी शनिवारी जांभळाचं झाड लावावं. जर या दिवशी झाड लावणं शक्य नसेल जांभळाचं झाड लावण्याचा संकल्प करा.  


- जर तुमच्या आईची तब्येत ठीक नसेल, तर शनिवारी शिवमंदिरात शिवलिंगावर दूधात पाणी मिसळून अभिषेक करणं फायद्याचं असतं. 


- ज्योतिष शास्त्रानुसार तुमच्यावर कामाचं प्रेशर असेल किंवा मानसिक तणाव असल्यास 2 मुखी रुद्राक्ष गळ्यात धारण करा. 


- घरात काही मांगलिक कार्य निर्विघ्न करायचं असल्यास शनिवारच्या दिवशी शिव मंदिरात तुमच्या हाताएवढा लांब सुताचा धागा शिवशंकराला अर्पण करा. याने घरातील मांगलिक कार्य सफल होतील. 


- जर घरात भांडणं होत असतील तर त्याला दूर करण्यासाठी सफेद रंगाचं वस्त्र मंदिरात दान करा. 


( विशेष नोंद - वरील बातमी ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. या बातमीच्या माध्यमातून आम्ही कोणत्याही अंधश्रद्धेला चालना देत नाही. वरील लेखात मांडलेल्या मुद्द्यांच्या सत्य असत्यतेवर zee 24 taas कोणतीही पुष्टी करत नाही. या गोष्टी फैनंदित आयुष्यात वापरायच्या झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. )