Shardiya Navratri 2022: शारदीय नवरात्रीला हा दुर्मिळ योग, घटस्थापनेला अतिशय शुभ योग
Shardiya Navratri 2022 Date: अश्विन महिन्याची प्रतिपदा 26 सप्टेंबरपासून एक दुर्मिळ योग सुरु होईल. यादरम्यान देशातील अनेक राज्यांमध्ये दुर्गापूजा थाटामाटात केली जाणार आहे.
Durga Puja 2022 : शारदीय नवरात्रीला सर्व पितृ अमावस्येच्या दुसऱ्या दिवसापासून सुरुवात होते. यावर्षी शारदीय नवरात्रीची सुरुवात 26 सप्टेंबरपासून होईल आणि त्यानंतर 5 ऑक्टोबरला दसरा किंवा विजयादशमी उत्सव साजरा केला जाईल. माँ दुर्गाच्या उपासनेचा हा 9 दिवसांचा सण यावर्षी अतिशय शुभ योग सुरु होत आहे. या शुभ मुहूर्तावर घटस्थापना केल्याने लोकांच्या जीवनात सुख-समृद्धी येते. गुजरात, मध्य प्रदेश, पंजाब-हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगालसह अनेक राज्यांमध्ये शारदीय नवरात्री आणि दुर्गापूजेचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो.
नवरात्रीचा अतिशय शुभ योग
26 सप्टेंबर 2022 पासून सुरु होणाऱ्या शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापनेसाठी संपूर्ण दिवस अतिशय शुभ असेल. यादरम्यान शुक्ल आणि ब्रह्मयोगाचा अप्रतिम संगम तयार होत आहे. जी पूजा आणि शुभ योगांसाठी अत्यंत शुभ मानली जाते. यानंतर सोमवार, 3 ऑक्टोबर रोजी महाष्टमीची व्रत-पूजा होणार आहे. दुर्गापूजेसाठी, अष्टमी-नवमी तिथीच्या संधि पूजेचा मुहूर्त दिवसाच्या 3:36 ते 4:24 पर्यंत असेल. त्याच वेळी, महानवमी तिथीचे मूल्य मंगळवार, 4 ऑक्टोबर रोजी असेल. नवमी तिथी दुपारी 01.32 पर्यंत राहील. यानंतर दशमी तिथी सुरू होईल. त्यामुळे विजयादशमी किंवा दसरा सण 4 आणि 5 ऑक्टोबर रोजी साजरा केला जाणार आहे. या दिवशी दुर्गा मूर्तींचे विसर्जन केले जाते. रावणाचे दहन केले जाते आणि त्यासोबत शस्त्रे व वाहनांची पूजा केली जाते.
माता दुर्गा हत्तीवर विराजमान
यंदा अश्विन महिन्यातील नवरात्रीमध्ये माता दुर्गा हत्तीवर स्वार होऊन येत आहे. माता दुर्गेची हत्तीची स्वारी जशी शुभ मानली जाते, तसेच ती अतिवृष्टीचेही सूचक आहे. माता दुर्गेची हत्तीची सवारी शेती आणि पिकांसाठी शुभ मानली जाते. यातून पैसा आणि धान्याचा साठा भरला जातो.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. त्यामुळे ZEE 24TAAS याची पुष्टी करत नाही.)