Shatruhanta Yog In Kanya Rashi: ज्योतिषशास्त्रानुसार नवग्रहाच्या स्थितीत बदल झाल्यामुळे अनेक प्रकारचे शुभ आणि अशुभ योग तयार होतात. यावेळी ग्रहांचा सेनापती आणि भूमीचा पुत्र मंगळ कन्या राशीत आहे. दरम्यान मंगळ ग्रहामुळे कन्या राशीमध्ये शत्रुहंत योग तयार झाला आहे. हा योग 18 सप्टेंबरपर्यंत राहणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, शत्रुहंता योग दोन शब्दांनी बनलेला आहे. या शब्दाचा अर्थ शत्रूंचा नाश करणारा आहे. हा योग शुभ योगांपैकी एक मानला जातो. या योगाच्या निर्मितीने काही राशींच्या व्यक्तींना त्यांच्या आयुष्यात चांगले परिणाम मिळणार आहे. जाणून घेऊया शत्रुहंत योगाच्या निर्मितीमुळे कोणत्या राशींच्या व्यक्तींना फायदा होणार आहे. 


मेष रास


या राशीमध्ये मंगळ हा आठव्या घराचा स्वामी आहे. यासोबतच त्यांचा कन्या राशीत प्रवेश झाला असून तो सहाव्या भावात स्थित आहे. याच ठिकाणी शत्रुहंता योग तयार होत आहे. हा योग तयार झाल्याने लोकांना कायदेशीर बाबींपासून दिलासा मिळू शकतो. तुम्हाला सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. मेहनतीच्या जोरावर तुम्ही प्रत्येक प्रकारे प्रशंसा मिळवाल. व्यावसायिक जीवनात अनेक प्रकारचे बदल पाहायला मिळतात. व्यवसाय किंवा क्षेत्रातील अनुभवी लोकांच्या सल्ल्याने तुम्हाला फायदा होईल.


कर्क रास 


या राशीच्या सहाव्या घरात मंगळ असल्यामुळे हा योग तयार होत आहे. अशा स्थितीत या राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकते. तुमच्या आत्मविश्वासाच्या बळावर तुम्ही प्रत्येक अडचणीतून मुक्त होणार आहात. व्यवसाय करणाऱ्या लोकांनाही अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. या काळात तुम्हाला गुंतवणुकीचा फायदा होऊ शकणार आहे.


तूळ रास 


या राशीच्या सहाव्या घरात शत्रुहंता योग तयार झाल्याने या राशीच्या लोकांना प्रत्येक आव्हानातून मुक्त होण्याची हिम्मत मिळणार आहे. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून तुमचं कौतुक होणार आहे.  नोकरी करणारे लोक त्यांच्या मेहनतीच्या जोरावर उंची गाठतील. राजकारणात तुमचा प्रभाव वाढेल आणि सरकारी क्षेत्राशी संबंधित कामे होतील. जे बेरोजगार आहेत त्यांना नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. 


( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )