VIDEO : पायात काळा धागा बांधावा की नाही? हे शुभ आहे अशुभ? काय सांगतात तज्ज्ञ
Black Thread : अलीकडे प्रत्येकाचा पायात काळा धागा बांधलेला आपण पाहतो. पायात काळा धागा बांधण्याच जणू ट्रेंड आलाय. पण पायात काळा धागा बांधावा की नाही, हा शुभ असतो कि अशुभ याबद्दल संभ्रम आहे. चला ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ काय सांगतात जाणून घेऊयात.
Black Thread Astro Upay : सेलिब्रिटी असो किंवा सर्वसामान्य असंख्य लोकांच्या पायात काळा धागा असल्याचा आपण पाहिलं आहे. अलीकडे पायात काळा धागा बांधणे हे फॅशनसोबत नवीन ट्रेंड युवा पिढीमध्ये दिसून येतो आहे. काळा धागाला धार्मिकदृष्ट्या महत्त्व आहे. ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ सांगतात की, काळा धागा बांधल्यामुळे नकारात्मक ऊर्जेपासून आपलं संरक्षण होतं. पण पायात काळा धागा घालावा की नाही याबाबत वेगवेगळी मतं आहेत.
पायात काळा धागा बांधावा की नाही?
काही लोकांचा असा विश्वास आहे की, शनिदेवाला पायात कधीही बांधू नये. काळा धागा हा शनिदेवाचं प्रतिक मानलं गेलंय. त्यामुळे पायावर काळा धागा बांधणे अशुभ मानले जाते. यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढते आणि शनिदेवाच्या क्रूर नजरेला सामोरे जावं लागतं. तज्ज्ञ सांगतात की, काळा धागा पायात बांधल्यामुळे शनिदेव पायात जातो. अशा स्थितीत शनिदेव त्यांच्या आयुष्यात अनेक संकट आणतात. तुमच्या आयुष्यात आर्थिक संकटासोबत आरोग्याची समस्या निर्माण होते. शनिदेवाला कायम मान- सन्मान द्यावे. काळा बांधा हातात किंवा गळ्यात परिधान करावा.
काळा धागा बांधण्याचे फायदे?
काही तज्ज्ञांच्या मते पायात काळा धागा धारण केल्याने अनेक फायदे होतात. काळा धागा पायात बांधल्यास आरोग्य चांगले राहते. राहू आणि केतू या छाया ग्रहांचा वाईट प्रभाव कमी होतो. आर्थिक चणचण दूर होते. शनीचा प्रभाव दूर होतो आणि दृष्टी मजबूत होते. पोटाशी संबंधित समस्या दूर होतात. ज्योतिष शास्त्रानुसार पायात काळा धागा धारण केल्याने वाईट नजर लागत नाही, असं मानलं जातं. तसंच यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर राहते. यामुळे आरोग्य आणि प्रगतीवर कोणताही वाईट परिणाम होत नाही.
काळा धागा धारण करण्यासाठी नियम!
पुरुषांनी उजव्या पायावर काळा धागा बांधावा.
महिलांनी डाव्या पायाला काळ्या रंगाचा धागा बांधावा.
काळा धागा नेहमी 9 गाठी बांधल्यानंतरच घालावा.
हा धागा बांधल्यानंतर रोज गायत्री मंत्राचा जप करावा.
शनिदेवाची कृपा मिळवण्यासाठी शनिवारी किंवा मंगळवारी काळा धागा धारण करणे लाभदायक ठरू शकते.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )