Shravan Somvar 2024 : 71 वर्षांनंतर यंदा श्रावणात दुर्मीळ योग! यंदा असणार इतके सोमवार; कधी कोणती शिवामूठ वाहायची?
Shravan 2024 : श्रावणमासाबद्दल दुर्मिळ योग जुळून आला आहे. यंदा सोमवारीपासून श्रावण महिन्याला सुरुवात होणार असून सोमवारीच श्रावण महिन्याची सांगता होणार आहे. त्याशिवाय 71 वर्षांनंतर अतिशय शुभ योग जुळून आला आहे.
Shravan Somvar 2024 in Marathi : महादेवाला समर्पित श्रावण महिन्याला ऑगस्टच्या नवीन आठवड्यापासून सुरुवात होणार आहे. दीप अमावस्येच्या दुसऱ्या दिवशीपासून श्रावण महिन्याला सुरुवात होते. हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे. या महिन्यात श्रावण सोमवार, शुक्रवार आणि शनिवारच व्रत करण्यात येतं. महिला श्रावणातील दर मंगळवारी मंगळागौरीची पूजा करतात.
यंदा श्रावण महिन्याला सोमवारी 5 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. तर सोमवारीच 2 सप्टेंबर 2024 श्रावण मास संपणार आहे. सोमवारी शंकराची पूजा करण्यात येते. त्याशिवाय यंदा 71 वर्षांनंतर दुर्मिळ योग जुळून आला आहे. यंदा श्रावणात चार नाही तर पाच सोमवार करायचे आहेत. यापूर्वी 1953३ मध्ये असा योग जुळून आला होता. त्यावर्षी सोमवारी 10 ऑगस्टला श्रावण सुरु झाला तर सोमवारीच 8 सप्टेंबरला श्रावणाची समाप्ती झाली होती.
श्रावण सोमवारच्या तारख्या नोंद करुन घ्या!
पहिला श्रावण सोमवार - 5 ऑगस्ट 2024
दुसरा श्रावण सोमवार - 12 ऑगस्ट 2024
तिसरा श्रावण सोमवार - 19 ऑगस्ट 2024
चौथा श्रावण सोमवार - 26 ऑगस्ट 2024
पाचवा श्रावण सोमवार - 2 सप्टेंबर 2024
कधी कोणती शिवामूठ वाहायची?
5 ऑगस्ट : तांदूळ
12 ऑगस्ट : तीळ
19 ऑगस्ट : मूग
26 ऑगस्ट : जव
2 सप्टेंबर : सातू
श्रावणात शिवमूठ का अर्पण करतात?
आपण देवाला जे अर्पण करु ते देव आनंदाने स्वीकार करतात. कारण धर्म सांगतो की, देण्याची वृत्ती हवी मग काहीही असो. त्यात भगवान महादेव हे भोळे आणि लहान मुलाप्रमाणे लगेच प्रसन्न होणारे. भोलेनाथ आणि पार्वतीकडे आपण सुखी दांपत्य जीवनाचा आदर्श म्हणून पाहतो. अशात विवाहप्रसंगीदेखील नववधू लग्नाला उभी राहण्यापूर्वी गौरीहार पूजते. त्यामुळे आदर्श नवविवाहितांसमोर यावा, त्यांच्या मनावर सहजीवनाचे सुसंस्कार व्हावे, यासाठी ही शिवामुठीची (Shivamuth 2024) कल्पना व्रतानुषंगाने योजली गेली असावी, असं मत ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर यांनी मांडलीय.
अशी करा महादेवाची पूजा!
सोमवारी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावेत. त्यानंतर महादेवाच्या मंदिरात जाऊन किंवा घरीच व्रत करण्याचा संकल्प करा. या व्रतामध्ये एक वेळ रात्री उपवास सोडू शकता. दिवसभर फलाहार तसंच दुध तुम्ही घेऊ शकता. संकल्प घेतल्यानंतर शिवलिंगावर जल आणि गायीचं दुध अर्पण करावे. त्यानंतर फुल, तांदूळ, कुंकू, बेलाचे पान अर्पण करावे. ही पूजा करताना शिव मंत्र - ऊँ महाशिवाय सोमाय नम: किंवा ऊँ नम: शिवाय। या मंत्राचा जप करा. त्यानंतर शिवमूठ अपर्ण करावी.
मंगळगौर तिथी 2024
पहिला मंगळगौर - 6 ऑगस्ट 2024
दुसरी मंगळागौर - 13 ऑगस्ट 2024
तिसरी मंगळागौर - 20 ऑगस्ट 2024
चौथी मंगळागौर - 27 ऑगस्ट 2024
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)