Venus Combust 2023 Impact : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका ठराविक वेळेनंतर आपली स्थिती बदलतात. ऑगस्ट महिन्याला सुरुवात झाली आहे. येत्या 48 तासांमध्ये काही राशींच्या लोकांना मोठी तिजोरी घेण्याची वेळ येणार आहे. कारण 3 ऑगस्टला संपत्तीचा कारक शुक्र आपली स्थिती बदलणार आहे. शुक्र ग्रह 03 ऑगस्टला संध्याकाळी 07:37 वाजता सिंह राशीत अस्त होणार आहे. धन, विलास, भौतिक सुख, प्रेम, प्रणय यांचा कारक असणारा शुक्र जेव्हा जेव्हा आपली जागा बदलतो तेव्हा तो काही राशींचं नशिब पालटतो. (shukra asta 2023 in singh 3 august 2023 Venus Combust effects these zodiac people good benefits)


'या' राशींना होणार श्रीमंत?


वृषभ (Taurus) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शुक्र अस्त वृषभ राशीच्या लोकांसाठी अतिशय शुभदायक ठरणार आहे. वृषभ राशीचा स्वामी शुक्र असल्याने या राशीला सर्वाधिक फायदा होणार आहे. भौतिक आणि चैनीच्या वस्तू, कपडे, दागिने खरेदी करणार आहात. कारण अचानक धनलाभ झाल्याने आनंदी आनंद वातावरण असणार आहे. तुमच्या आयुष्यात प्रेमाची एन्ट्री होणार आहे. तुमच्या व्यक्तिमत्त्वाला वेगळी चमक प्राप्त होणार आहे. तुमचं बँक बॅलेन्स वाढणार आहे. अविवाहित लोकांचं लग्न ठरण्याचे योग आहेत.


सिंह (Leo)


 शुक्र अस्तामुळे सिंह राशीच्या लोकांना संपत्ती, प्रतिष्ठा आणि सन्मान प्राप्त होणार आहे. अकडलेले पैसे त्यांना परत मिळणार आहे. तुम्ही आखलेल्या योजना यशस्वी होणार आहेत. आतापर्यंत तुम्ही केलेल्या गुंतवणुकीतून फायदा होईल. शिवाय गुंतवणुकीसाठी हा काळ उत्तम असणार आहे. रखडलेली कामं मार्गी लागणार आहेत. खर्चावर नियंत्रण ठेवण्यात यशस्वी होणार असल्याने तुमचं बँक बॅलेन्स वाढणार आहे. लव्ह लाइफमध्ये जोडीदारासोबत मधुर संबंध प्रस्थापित करु शकणार आहात. 


कर्क (Cancer)


 शुक्र ग्रहाची अस्त कर्क राशीच्या लोकांना लाभदायक ठरणार आहे. तुमचा आत्मविश्वास या दिवसांमध्ये वाढणार आहे.  तुमचं व्यक्तिमत्व उजळून निघणार आहे. तुमच्या योजनांमध्ये उंच शिखर गाठणार आहात. पाटर्नरशीपमधील कामात यश मिळणार आहे. उत्पन्नात वाढ होणार असून विवाहित लोकांच्या जीवनात आनंदच आनंद असणार आहे. 


 


हेसुद्धा वाचा - August Grah Gochar 2023 : ऑगस्ट महिन्यात 'या' मोठ्या ग्रहांचं गोचर, 'या' राशींचं नशिब चमकणार


 


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)