Shukra Gochar 2022 : डिसेंबरमध्ये शुक्राने दोनवेला राशी बदलली ज्यामुळे सर्व 12 राशीच्या लोकांवर परिणाम होणार आहे. हे संक्रमण या वर्षातील शुक्राचं शेवटचे संक्रमण असणार आहे. हा राशी बदल अनेकांसाठी शुभ तर अनेकांसाठी अशुभ असू शकतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्योतिषशास्त्राप्रमाणे, शुक्र प्रथम 5 डिसेंबरला धनु राशीत प्रवेश करणार आहे तर नंतर 29 डिसेंबरला मकर राशीत प्रवेश करणार आहे. जाणून घेऊया शुक्राच्या या संक्रमणामुळे कोणत्या राशीसाठी अनुकूल काळ असणार आहे.


मेष


या राशीच्या व्यक्तींची सर्व काम व्यवस्थित होतील. आर्थिक स्थिती चांगली राहील आणि तुमचे पैसेही वाचणार आहेत. तुम्हाला चांगले पैसे मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात चांगला फायदा मिळू शकतो. तुमचे आरोग्य चांगले राहील.


कन्या


या राशीच्या व्यक्तीच्या आयुष्यात सुख-समृद्धी येणार आहे. कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण राहू शकतं. तुमचे संबंध मजबूत राहतील. तुम्हाला तुमच्या आईचा पूर्ण पाठिंबा मिळणार आहे. करिअरमध्ये प्रगती करणार आहात. तुम्ही कोणताही नवीन व्यवसाय सुरु करू शकता.


तूळ


या राशीच्या व्यक्तींना शुक्राची साथ मिळणार आहे. घरगुती जीवन चांगलं राहण्याची शक्यता आहे. पैसे मिळण्याची दाट शक्यता आहे. भावंडांशी तुमचे संबंध दृढ होतील.