Shukra Gochar 2022:  ग्रहांच्या गोचरामुळे राशीचक्रातील 12 राशींवर परिणाम होत असतो. त्यामुळे कोणता ग्रह कोणत्या राशीत आहे, यावरून भाकित वर्तवलं जातं. आता 11 नोव्हेंबर शुक्र ग्रह (Shukra Gochar) राशी बदल करणार आहे. शुक्र ग्रह तूळ (Tul) राशीत वृश्चिक (Vrushchik) राशीत प्रवेश करणार आहे. शुक्र ग्रहाला सुख, समृद्धी, धनाचा कारक मानलं जातं. तसेच वृषभ आणि तूळ राशीचा स्वामी देखील आहे. त्यामुळे काही राशींवर शुभ तर काही राशींवर अशुभ परिणाम जाणवणार आहे. शुक्र गोचरामुळे पाच राशींना शुभ फळ मिळणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तूळ- शुक्र ग्रह या राशीतून वृश्चिक राशीत जाणार आहे. म्हणजेच शुक्र ग्रह दुसऱ्या स्थानात विराजमान होणार आहे. या काळात चांगल्या बातम्या मिळू शकतात. अचानक धनलाभ होऊ शकतो. या काळात आर्थिक स्थिती मजबूत होईल. गुंतवणुकीसाठी उत्तम काळ आहे. 


मकर- 11 नोव्हेंबरनंतर या राशींसाठी चांगला काळ आहे. समाजात मानसन्मान वाढेल. धनलाभ होईल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. वाहन आणि घर खरेदीचा योग आहे. 


धनु- शुक्र गोचरादरम्यान जे काम कराल त्यात यश मिळेल. कौटुंबिक वातावरण चांगलं राहील. उत्पन्नाचे नवे स्रोत तयार होतील. 


Mangal Vakri 2022: वक्री मंगळ ग्रहामुळे राजयोग, 4 राशींना होणार फायदा


सिंह- या काळात आर्थिक स्थिती सुधारेल. सुख सुविधांमध्ये वृद्धी होईल. या काळात व्यवसायात नफा मिळेल. नोकरीत प्रमोशन मिळण्याची दाट शक्यता आहे.


कुंभ- शुक्र गोचर या राशींसाठी फलदायी ठरेल. ऑफिसमध्ये बॉस तुमच्या कामावर खूश होईल. करिअरमध्ये नव्या संधी मिळतील. 


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)