Shukra Gochar Effects : शुक्र देव अनेकांचे भले करणार असतो. तसेच सुखाचा कारक मानला जातो. शुक्र गोचरमुळे सामान्यतः लोकांना फायदा होतो, परंतु यावेळी गोचर 3 राशींच्या लोकांसमोर संकटाचे कारण बनले आहे. वैदिक शास्त्रात शुक्र हा शुभ ग्रह मानला गेला आहे. ते सौंदर्य, आनंद आणि समृद्धीचे घटक आहेत. असे म्हणतात की ज्या व्यक्तीवर शुक्र ग्रहाची कृपा होते, त्याला आयुष्यात कशाचीही कमतरता भासत नाही. इतर ग्रहांप्रमाणे शुक्र देखील नियमितपणे आपली राशी बदलत असतो. त्याच्या या गोरचमुळे अनेक राशीच्या लोकांच्या आयुष्यात आनंद येतो, तर अनेक राशीच्या लोकांच्या आयुष्यात संकट येणार आहे. 2 मे रोजी शुक्राचे मिथुन राशीत प्रवेश झाला आहे. यामुळे तीन राशींवर संकटाचा काळ सुरु आहे, त्यामुळे त्यांनी अत्यंत सावध राहून विशेष उपाय करणे आवश्यक आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मीन
 मिथुन राशीतील शुक्राचे गोचर  या राशीच्या लोकांसाठी अनेक समस्या घेऊन आले आहे. तुम्हाला आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते. कोर्ट-कचेर्‍यांशी संबंधित प्रकरणांमध्ये तुमच्या विरोधात निर्णय येऊ शकतो. तुम्हाला तुमचे वैयक्तिक जीवन आणि व्यावसायिक जीवन यामध्ये संतुलन राखण्याची गरज आहे. तसेच योगसाधना करा, जेणेकरून तुम्ही या कठीण काळातून शांततेने पार पडू शकाल. व्यवसाय करणाऱ्या लोकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबतच्या नात्यात चढ-उतार येऊ शकतात. 


धनु


कुंडलीत कोणत्याही चुकीच्या योगामुळे तुम्ही विवाहबाह्य संबंधांकडे वाटचाल करु शकता. यामुळे तुमच्या जोडीदाराशी वाद वाढू शकतात. शेजाऱ्यांशी भांडण होऊ शकते. वाहन चालवताना अपघात होण्याचीही शक्यता असते. शुक्राच्या या संक्रमणादरम्यान तुम्हाला अधिक सावध राहण्याची गरज आहे. या संक्रमण काळात समाजातील तुमचा मान आणि प्रतिष्ठा दुखावू शकते. हा अशुभ वेळ टाळण्यासाठी दर शुक्रवारी लक्ष्मी आणि शुक्र देवाची पूजा करावी. यासोबतच बोलण्यावरही संयम ठेवा.


कर्क  
 इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीमध्ये तुम्हाला नुकसान सहन करावे लागू शकते. घरात मतभेदही होऊ शकतात. शुक्र गोचर प्रभावामुळे तुमचे अनेक नुकसान होण्याची शक्यता आहे. तुमचे खर्च अपरिमितपणे वाढतील. उत्पन्नाच्या तुलनेत खर्चात झालेली वाढ पाहून तुम्ही अस्वस्थ व्हाल. नोकरी-व्यवसायातही नुकसान होण्याची शक्यता आहे. घरातील एखादा सदस्य अचानक गंभीर आजारी पडू शकतो. या समस्या दूर करण्यासाठी शुक्रवारी गाईला भाकरी खाऊ घाला. तसेच छतावर पक्ष्यांसाठी धान्य आणि पाणी ठेवण्यास सुरुवात करा. 


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.  ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)