Shukra Gochar 2023 Zodiac Signs in marathi : देशभरात सर्वत्र होळी  (Holi 2023) आणि धुलीवंदनाची उत्सुकता दिसून येतं आहे. विविध रंगांनी आणि पिचकऱ्यांनी बाजारपेठा सजल्या आहेत. अशातच होळीनंतर म्हणजे रंगपंचमीला काही राशींचे भाग्य उजळणार आहे. ज्योतिषशास्त्रात ग्रह गोचरला  (Shukra Gochar 2023 )  विशेष महत्त्व आहे. ज्योतिषशास्त्रातील सर्वात शुभ ग्रह शुक्र मेष राशीत प्रवेश (Venus Transit Change) करणार आहे. शुक्राचं संक्रमण 12 मार्च 2023 ला होणार आहे. सकाळी 8.12 वाजता शुक्र मेष राशीत प्रवेश करणार आहे. शुक्र हा धन आणि समृद्धीचा कारक असल्यामुळे शुक्र गोचरमुळे काही राशींचं (Zodiac Signs) भाग्य चमकणार आहे. (Shukra Gochar 2023 these zodiac sign Gemini Leo Aries Sagittarius Pisces get money After Holi in marathi)


'या' राशींचं भाग्य चमकणार!


मिथुन  (Gemini)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या राशीच्या लोकांसाठी शुक्राचं संक्रमण अतिशय भाग्यशाली ठरणार आहे. नवीन नवीन लोकांशी तुमची ओळख होणार आहे. या लोकांना अचानक धनलाभ होणार आहे. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अतिशय चांगला असणार आहे. घरातील वातावरण आनंदी असणार आहे. तुम्हाला आनंदाची बातमी मिळू शकते.


सिंह (Leo)


शुक्र गोचर या राशीसाठी फायदेशीर ठरणार आहे. खास करुन विवाहितांनासाठी शुक्र संक्रमण उत्तम काळ घेऊन येणार आहे. नवीन कामात यश मिळणार आहे. परदेश दौऱ्याची जाण्याची संधी मिळणार आहे. नोकरीचे नवीन मार्ग दिसणार आहेत. या राशीच्या लोकांना कुटुंबातील लहान भावंडांकडून साथ मिळणार आहे. 


मेष (Aries)


शुक्रचा संक्रमण मेष राशीत होणार असल्याने हे गोचर या राशीच्या लोकांसाठी सर्वात जास्त भाग्यशाली ठरणार आहे. प्रत्येक गोष्टींमध्ये या लोकांना लाभ मिळणार आहे. मित्रपरिवार, कुटुंब यात आनंदाचं वातावरण असणार आहे. जोडीदारासोबत नातं मजबूत होणार आहे. प्रत्येक कामात यश मिळणार असून धनलाभ होणार आहे. व्यवसायात मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे. 


धनु (Sagittarius)


शुक्राचं संक्रमण हे या राशीच्या लोकांसाठी अनेक शुभवार्ता घेऊन येणार आहे. विद्यार्थ्यांसाठी हा सर्वात चांगला काळ असणार आहे. घरावरील आर्थिक संकट दूर होणार असल्याने आनंदाचं वातावरण असणार आहे. वेगवेगळ्या मार्गांतून तुम्हाला धनलाभ होणार आहे. तर नोकरदार वर्गातील लोकांचे पदोन्नती होणार आहे. 


मीन (Pisces)


या राशीसाठीही शुक्र गोचर आनंदच आनंद घेऊन येणार आहे. आर्थिक व्यवहारात काळजीपूर्वक वागा. मात्र प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळणार आहे. सासरच्या लोकांकडून आनंदाची बातमी मिळणार आहे. या काळामध्ये तुम्ही लोकांना तुमच्याकडे आकर्षित करु शकाल. 


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)